Kartik Pornima Horoscope In Marathi : कार्तिक पौर्णिमा ही यंदा शुक्रवारी १५ नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. पुराणात या दिवसाचे महत्त्व स्नान, जप, तपश्चर्या आणि व्रत या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे ज्यामुळे २०२५ च्या नवीन वर्षांपर्यंत लाभ होतील. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेला कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
कार्तिक पौर्णिमा ही यंदा शुक्रवारी १५ नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. पुराणात या दिवसाचे महत्त्व स्नान, जप, तपश्चर्या आणि व्रत या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे ज्यामुळे २०२५ च्या नवीन वर्षांपर्यंत लाभ होतील.
ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक पौर्णिमेला चंद्र मेष राशीत असेल आणि मंगळासोबत राशीपरिवर्तन योग तयार करेल, यासोबतच मंगळ आणि चंद्र एकमेकांपासून चतुर्थ दशमात असल्यामुळे धन योगचा संयोग तयार होईल. तसेच चंद्र-गुरु यांच्यातील द्वादश योगामुळे सुनाफ योगही तयार होईल. तसेच शनिदेव त्याचा मूळ त्रिकोण राशीत असल्याने शश राजयोग ३० वर्षानंतर तयार होत आहे.
कार्तिक पौर्णिमेला तयार होत असलेल्या शुभ योगाचा दुर्मिळ संयोग नवीन वर्षापर्यंत अनेक राशीच्या लोकांसाठी धन, सुख आणि सौभाग्य वाढेल. कुटुंबात सुख, शांती आणि प्रतिष्ठा नांदेल. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेला कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मेष – सकारात्मक राहाल
कार्तिक पौर्णिमेला शुभ संयोग तयार होत असल्याने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या शुभ योगात जीवनातील अनेक समस्या दूर होतील. घरात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल.
वृषभ- चिंता संपेल
वृषभ राशीच्या लोकांना कार्तिक पौर्णिमेच्या शुभ संयोगाने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणावापासून मुक्ती मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. सरकारी नोकरीच्या संधी मिळतील. तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहे. कुटुंबातील लोक आनंदी असतील. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यात चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबत सुरु असलेले वाद संपतील
सिंह – इच्छा पूर्ण होतील
कार्तिक पौर्णिमेला शुभ योगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांची बुद्धी वाढेल. जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. जमीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला परतावा मिळेल. नवीन व्यवसायात स्वत:चे स्थान सुरक्षित कराल. येणारे वर्ष तुमच्यासाठी लकी ठरेल. कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण कराल.
कन्या – गुंतवणुकीतून फायदा
कार्तिक पौर्णिमेला शुभ योग तयार होत असल्याने कन्या राशीच्या लोकांना पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळतील. वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमचे वर्चस्व स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नात वाढ होईल. भविष्य डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करा, त्यातून फायदा होईल.
तुळ – उत्साहात वाढ
कार्तिक पौर्णिमेला शुभ योग तयार होत असल्याने तुमचे आरोग्य चांगले राहिल. रोगप्रतिकारशक्ती वाढेल. तुमच्या उत्साह देखील वाढ होईल. जोडीदारासोबत आनंदाचा अनुभव घ्याल. अडकलेले पैसे या काळात मिळण्याची शक्यता आहे. शुभ योगामुळे व्यवसायात नफा चांगला मिळेल. येत्या काळात व्यवसाय वाढवाल.
कुंभ – पैसे कमावण्याची संधी मिळेल.
कार्तिक पौर्णिमेला शुभ योग तयार होत असल्याने लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. स्वत:वर पैसे खर्च करण्याची संधी मिळेल. पैसे कमावण्याच्या बाबतीत चांगल्या नफ्याचे संकेत मिळतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. मिळालेल्या पैशाने तुम्ही अनेक योजनांमध्ये गुंतवणूक कराल. ज्यातून चांगला परतावा मिळेल. या काळात कुटुंबात शुभ कार्यक्रम घडेल.