Omraje Nimbalkar :मोदींच्या डबल मतं घेतली, सासुरवास संपवला, बार्शीच्या सभेत ओमराजे बरसले

जनतेने, मोदींपेक्षा दुप्पट म्हणजे तीन लाख ३० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून देऊन “मोदींमुळे आलो, मोदींमुळे आलो” असं म्हणणाऱ्यांना चपराक लगावली आहे, असे बार्शीच्या प्रचारसभेत ओमराजे म्हणाले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ‘कॉंटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. युतीतून आघाडीत आणि आघाडीतून युतीत गेलेल्या सत्तावीरांचा प्रचारसंग्राम सध्या पहायला मिळत आहे.बार्शी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल अशी लढत होते आहे. मंगळवारी दिलीप सोपल यांच्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेसाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर देखील उपस्थित होते. दिलीप सोपल यांना निवडून आणण्यासाठी ओमराजेंनी मतदारांना आवाहन केले. तसेच विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

………..तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यासाठी रोखू शकत नाही”

“आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांमध्ये राहून,लोकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना पटलेले असू ,तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यासाठी रोखू शकत नाही” असे ओमराजे विरोधकांना उद्देशून म्हणाले. अनेकजण विरोधात असूनही शिवाय,मतदारांवर ‘पैशांचा पाऊस’ पडत असताना देखील या गोष्टींना लाथाडून जनतेने, मोदींपेक्षा दुप्पट म्हणजे तीन लाख ३० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून देऊन “मोदींमुळे आलो, मोदींमुळे आलो” असं म्हणणाऱ्यांना चपराक लगावली आहे, असाही टोला ओमराजेंनी विरोधकांना लगावला.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

campaignMaharashtra politicsomraje nimbalkarshivsena ubtvidhansabha nivadnuk 2024उद्धव ठाकरेदिलीप सोपलबार्शी बातमीमहाविकास आघाडीसोलापूर बातमी
Comments (0)
Add Comment