इंग्रजी येत नाही, पण अर्थसंकल्प सांभाळतोय… साडेसहा लाख कोटीत कुठे टिंब द्यायचा सांगा; अजितदादांचा टोला

Ajit Pawar On English Language : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना इंग्रजी येत नसलं, तरी आपण अर्थसंकल्प सांभाळतो आहे, साडेसहा लाख कोटीत कुठे टिंब द्यायचा हे सांगा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : अलीकडे काही जणांना काम केलं की, आज लगेच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. मी १९८७ साली खरेदी – विक्री संघात बसायचो. तेथून कामाची सुरुवात केली. खरेदी – विक्री संघात दूध संघात तेथून कामे सुरू केली. १९८४ ला कारखान्यावर निवडून दिले. त्यानंतर पोल्ट्री, डेअरी करत शेती केली. १९८८ साली पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा फायदा तालुक्याला कसा होईल यासाठी हे मी पाहिलं. पवार साहेबांचा प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन आपली कामे मार्गी लावली. अशी कामे करत १९९१ ला खासदार झालो. मात्र काही लोक काल काम नाही सुरू केलं तोवरच त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांना टोला लगावला.
Baramati News : दोन ठिकाणी पाडवा झाल्यामुळे लोकांचा वेळ वाचतो, गर्दी विखुरली जाते; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारासाठी बारामतीत आले होते. बारामतीतील लोणी भापकर, जळगाव क.प, मेडद या ठिकाणी त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
Rahul Gandhi : ते अंबानींच्या लग्नात गेले; पण मी गेलो नाही, कारण… राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
दरम्यान उपस्थित कार्यकर्त्याने अजित पवारांना इंग्रजी बोलता येत नाही असे विरोधक बोलतात, अशी तक्रार पवारांकडे केली. यावर अजित पवार म्हणाले की, मला जरी इंग्रजी बोलता येत नसले, तरी मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. राज्याचा साडेसहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सांभाळत आहे. विरोधकांना म्हणावं…. साडेसहा लाख कोटीमध्ये कुठे टिंब द्यायचा ते सांगा…. असं म्हणत तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणे बरोबर नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
Pune News : आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? भर सभेत अजितदादांनी शरद पवारांच्या एक्क्याला फैलावर घेतलं

Pune News : इंग्रजी येत नाही, पण अर्थसंकल्प सांभाळतोय… साडेसहा लाख कोटीत कुठे टिंब द्यायचा सांगा; अजितदादांचा टोला

ही निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आठ ते दहाच नावे प्रमुख म्हणून घेतली जातात. त्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशी आठ – दहाच नावे चर्चिली जातात. तिथपर्यंत पोहोचायला काही वर्ष घासावी लागतात. एकदम माणूस निवडून आला की, तिथ पर्यंत पोहोचू शकत नाही, असेही पवार म्हणाले.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Ajit Anantrao Pawarajit pawar on english languagebaramati newsvidhan sabha nivadnuk 2024Yugendra Pawarअजित पवार इंग्रजी येत नाही युगेंद्र पवारउपमुख्यमंत्री अजित पवारबारामती अजित पवार भाषणयुगेंद्र पवारविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment