‘शरद पवार आणि अमित शहांच्या बैठकीनंतर पहाटेचा शपथविधी ‘; दादांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule talk about Meeting : २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना शपथविधीबाबत अनभिज्ञता व्यक्त केली असून अजित पवारांनीच याबाबत खुलासा करावा असे म्हटले आहे. तर रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधत खोटे बोलून उमेदवार निवडून आणण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘शरद पवार आणि अमित शहांच्या बैठकीनंतर पहाटेचा शपथविधी ‘; दादांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

नागपूर : पहाटेच्या शपथविधी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला होता. यामध्ये, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची एका उद्योगपती यांच्या घरी एक बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्ता स्थापन केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या शपविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. मी झोपले होते, सदानंद सुळे यांनी मला उठवलं आणि सांगितले की टीव्ही बघा काय सुरुय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एक तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अजित पवार देऊ शकतील. कारण मी ऑन कॅमेरा सांगते, अशी कुठलीही मीटिंग झाली त्याची माहिती मला नाही. झाली की नाही ते मला माहिती नाही. आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी या आधी सांगितलेलं आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो मी सकाळी झोपले होते. सदानंद सुळे यांनी मला उठवलं आणि सांगितले की टीव्ही बघा काय सुरु आहे. त्यामुळे मला आमच्या पक्षाला त्या मीटिंग बद्दल काही माहिती नाही. पहाटेच्या शपथविधी बद्दलही माहिती नाही. त्यामुळे मीटिंग कुठे झाली कधी झाली झाली की नाही याची सगळ्यांची उत्तर अजित पवारांना द्यावे लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांची बॅग का तपासल्या जात आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे. नेहमी नेहमी उद्धव ठाकरेच का? कधी अमोल कोल्हे यांची आणि आणि योगायोग यामध्ये भाजपमध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांचीच बॅगची तपासणी झाली बाकी कुठल्याच नेत्यांची झाली नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया देताना दादांवर निशाणा साधलाय. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की अदानींना थेट विचारा की काय घडलं ते मग आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी काय ते कळेल. आपल्या हातातून निवडणूक जात आहे आणि कोणताही पर्याय नसतो तेव्हा खोटं बोलावं लागतं. खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा हा केविलवाना प्रयत्न असावा तो प्रयत्न अजित पवार करताना पाहायला मिळत असल्याचं रोहित पवार म्हणाले.

Source link

amit shah and sharad pawar meetingSharad PawarSupriya SuleVidhan Sabha Nivadnukअजित पवारपहाटेचा शपथविधीशरद पवारसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment