शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; आज प्रचारात दिसला, CMकडून भरसभेत शब्द

Eknath Shinde: शिवसेनेत ऐतिहासिक बंड करताना साथ देणाऱ्या जवळपास सगळ्याच आमदारांना एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत तिकीट देत त्यांना संधी दिली. शिंदेंनी केवळ एकाच आमदाराचं तिकीट कापलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पालघर: शिवसेनेत ऐतिहासिक बंड करताना साथ देणाऱ्या जवळपास सगळ्याच आमदारांना एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत तिकीट देत त्यांना संधी दिली. शिंदेंनी केवळ एकाच आमदाराचं तिकीट कापलं. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या जागी पक्षानं भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना संधी दिली. यानंतर वनगा घरातून बेपत्ता गेले. त्यांचा ठावठिकाणा सापडत नव्हता. शिंदेंनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, अशी खंत व्यक्त करत वनगा ढसाढसा रडले होते. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या पालघरमधील सभेला वनगा उपस्थित होते.

पालघरमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदेंनी वनगा यांचा आवर्जून उल्लेख केला. व्यासपीठावरुन भाषण करताना त्यांनी हजारो जणांच्या उपस्थितीत वनगा यांना पुनर्वसनाचा शब्द दिला. मी कोणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही. श्रीनिवास वनगा यांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन शिंदेंनी वनगा यांना दिलं. वनगा २०१९ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले. त्यांचे वडील चिंतामण वनगा भाजपचे खासदार राहिले आहेत.
Ajit Pawar: प्रतिभा काकींना एक प्रश्न नक्की विचारणार! मिसेस शरद पवारांची कृती दादांच्या मनाला लागली
सभेत काय म्हणाले शिंदे?
‘श्रीनिवास वनगा यांचं मी मुद्दाम अभिनंदन करतो. उमेदवारी रद्द झाल्यानंतर दु:ख वाटणं साहजिक आहे. माणूस आहे म्हटल्यावर दु:ख वाटणारच. त्यांच्या वेदना मला समजल्या. माझा त्यांच्याशी नंतर संपर्क झाला. मी त्याला विचारलं, श्रीनिवास तुझा माझ्यावर विश्वास आहे? तो म्हणाला हो. मी त्याला विचारलं, मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय का? तो म्हणाला नाही. श्रीनिवास वनगाला वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा शब्द आहे,’ असं शिंदे भरसभेत म्हणाले.
Ajit Pawar: दादांना ‘शरद पवार पॅटर्न’ची भुरळ, लोकसभेत गाजलेला फॉर्म्युला वापरणार; बंपर यश मिळणार?
दोन आठवड्यांपूर्वी शिंदेसेनेची उमेदवार यादी जाहीर झाली. त्यात भाजपमधून आलेल्या अनेकांच्या नावांचा समावेश होतो. शिंदेंनी बंडात साथ देणाऱ्या जवळपास सगळ्याच आमदारांना संधी दिली असताना वनगा यांचं तिकीट मात्र कापलं. त्यामुळे वनगा प्रचंड दु:खी झाले. ते अक्षरश: ढसाढसा रडले. ते तणावाखाली असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. श्रीनिवास यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरु असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केला. त्यानंतर काही तासांमध्येच ते बेपत्ता झाले. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. अनेक तास ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. अखेर बऱ्याच तासांनी ते घरी परतले. आज ते शिंदेंच्या सभेला उपस्थित होते.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Eknath ShindeMaharashtra Political Newsshiv senashrinivas vangaएकनाथ शिंदेपालघर आमदारमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकशिवसेनाश्रीनिवास वनगा
Comments (0)
Add Comment