फडणवीसांसारख्या तरुण नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती, सुप्रिया सुळे असे का म्हणाल्या?

Supriya Sule Criticize Devendra Fadnavis: मी दोन पक्ष फोडले, असे विधान फडणवीसांनी केले याची आम्हालाही अपेक्षा नव्हती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे, असे विधान सुप्रिया सुळेंनी केले आहे.

Lipi

नागपूर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून राजकीय नेत्यांकडून शाब्दिक वार-प्रहार केले जात आहेत. अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अनेकदा टीका केली. आजही सुळेंनी पक्षफुटीवरुन फडणवीसांना पुन्हा घेरले आहे.देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांच्याकडे मोठ्या आदराने बघितले जायचे, पण मी दोन पक्ष फोडले, असे विधान त्यांनी केले आम्हाला ही अपेक्षा नव्हती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्या प्रचारासाठी नागपुरात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. महविकास आघाडी सरकारच्या काळात ते विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते, त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. एक तरुण करिष्माई नेता पाच वर्षे मुख्यमंत्री होता, अशा तरुण नेत्याकडून अपेक्षा होत्या. विरोधकांची सहानुभूती असताना राजकारण करण्यात मजा येते, मात्र त्यांनी दुफळीचे राजकारण केल्याने राज्यातील जनता समाधानी नाही, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ‘देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचनाबाबत ७० हजार कोटींचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांबाबत पुढाकार घ्यावा. खरे तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित होते.’ तसेच ‘फडणवीस यांनी गोपनीयतेची शपथ घेतली, मात्र पक्षावर आरोप करणाऱ्या व्यक्तीला घरी बोलावून फाइल दाखवली, मुख्यमंत्र्यांच्या घरी बसून ती फाईल अजित पवारांना दाखवली. हे आम्ही म्हणत नसून खुद्द अजित पवारांनीच तसे सांगितले. भ्रष्ट म्हटले तर भ्रष्टाचार मुक्त भारताचे काय झाले?’ असा खडा सवाल देखील सुळेंनी उपस्थित केला.

शरद पवार यांच्यासंदर्भातील वक्तव्य दुर्दैवी

ही शरद पवार यांची शेवटची निवडणूक आहे, असे विधान सत्ताधारी करत असतील तर ते दुर्दैवी आहे. कोणीही शत्रू असे म्हणणार नाही. गेल्या सहा दशकांच्या राजकारणात शरद पवारांनी मतदारांना कधीच भावनिक केले नाही, त्यांनी विकासावर मते मागितली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आमचे विरोधक असले तरी मोदींना दीर्घायुष्य लाभो.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

devendra fadnavis bjpMaharashtra vidhan sabha nivadnuknagpur vidhan sabhancp sharad pawarSupriya Suleदेवेंद्र फडणवीसांवर टीकानागपूर विधानसभेतील राजकारणविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीशरद पवारांची राष्ट्रवादीसुप्रिया सुळेंचे विधान
Comments (0)
Add Comment