Uddhav Thackeray on CM Post : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील २ नेत्यांची नावं सांगितली आहेत.
एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, जर शरद पवारांना जास्त जागा मिळाल्या, तर त्यांच्याकडे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा इतर अनेक नेते असतील, तर त्यांनी यांची घोषणा करावी. काँग्रेसने घोषणा करावी, मी घोषणा करेन. पण मला हे महाराष्ट्राचे लुटारू नको आहेत. त्यांनी माझ्या पाठीत वार केला याचा मला राग आहे, पण याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्रीपदावर भाष्य केलं होतं.
शरद पवारांनी सांगितला CM पदाचा फॉर्म्युला
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगितला होता. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, अस शरद पवार म्हणाले होते. ज्याला जास्त जागा मिळतील, त्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा आणि सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा, हे आमच्या पक्षाचे धोरण आहे, अस सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची आपली भूमिका मांडली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आग्रही होते. उद्धव ठाकरे यांनी एका सार्वजनिक बैठकीत शरद पवार आणि काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी केली होती. मात्र शरद पवार आणि काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला स्वीकारलं नव्हतं.
Uddhav Thackarey : महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? CM पदासाठी दोन दावेदार
मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे म्हणलेले…
मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर बोलताना सांगितलं की, तुम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच आहे, पण मला तस अजिबात वाटत नाही. माझ्या मनात असा वेडेपणा असता तर मी वर्षा निवास सोडलं नसत, पण मी वर्षा बंगल्यावरुन असलेल्या कपड्यांसह एका मिनिटात निघालो होतो, मला फक्त महाराष्ट्र वाचवायचा आहे. मुख्यमंत्रिपदापेक्षा तुमचे प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, अस ते म्हणाले होते.