चांदिवाल आयोगाचा अहवाल धक्कादायक, वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे नाहीत, फडणवीसांनी अनिल देशमुखांना घेरले

Devendra Fadnavis takes jab on Anil Deshmukh: चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे, त्यांनी अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीनचीट दिले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना पुन्हा घेरले आहे.

Lipi

नांदेड : ऐन विधानसभा निवडणुकीत १०० कोटीच्या वसूली प्रकरणाचा चांदिवाल आयोगाचा अहवाल पुन्हा चर्चेत आला आहे. अनिल देशमुखांनी याप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसल्याचे वारंवार म्हटले आहे. पण आता देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना पुन्हा घेरले आहे. ‘चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे, त्यांनी अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीनचीट दिले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. हा अहवाल उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच आला आहे, पण त्यांनी त्यावर काहीही कार्यवाही केली नाही, याप्रकरणी सीबीआय चौकशी केली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजप उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ आज मुखेड मतदारसंघात आले असता फडणवीसांनी चांदिवाल आयोगाच्या अहवालावर प्रतिक्रिया दिली.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘चांदिवाल यांनी सांगितलंय आरोपी आणि साक्षीदार यांची एकत्रित भेट एक डीसीपी करून देत होता. अनेक पुरावे मला दिसत होते. पण यांच्यात साटंलोटं असल्यामुळे मला ते रेकॉर्डवर घेता आले नाहीत’ म्हणजे साक्षीदारावर दबाव टाकला जात होता हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा भ्रष्टाचार झाला आहे, वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे काहीच असू शकत नाहीत.’
Sharad Pawar: गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, यावरुन एका गोष्टीचा खुलासा मात्र होतो, सचिन वाझेने कोर्टाला पत्र लिहलं त्यात त्यांच्यावर कस दबाव आणला हे सांगितलं. पत्राची सत्यता आला स्पष्ट झाली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, तत्कालीन गृहमंत्री आणि सरकार यामध्ये सामील आहेत का? त्याची चौकशी करणे गरजेचं आहे.’

‘चांदिवालांनी स्पष्ट केलंय जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला. पण कर नाही त्याला डर कशाचा, त्यामुळे ते मला गोवू शकले नाहीत.’ हा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं मत आहे की या प्रकरणाची एक फ्रेश सीबीआय चौकशी केली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगचीही तपासणी

राज्यात राजकीय नेत्यांच्या बॅग तपासणी वरून सध्या वादंग निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सलग दोन वेळेस बॅगा तपासण्यात आल्या. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील कर्मचाऱ्यांकडून बॅग तपासण्यात आली. मुखेडचे आमदार तसेच भाजपचे उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुखेडला आले होते. नांदेड विमानतळावरून देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने मुखेड येथे दाखल झाल्यानंतर हेलिपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

100 crore Extortion caseanil deshmukh casechandiwal reportDevendra FadnavisMaharashtra vidhan sabha nivadnukअनिल देशमुखांवरील वसुलीचे आरोपचांदिवाल आयोगाचा अहवालदेवेंद्र फडणवीसांची टीकाविधानसभा निवडणुकीच्या घडामोडी१०० कोटी खंडणी प्रकरण
Comments (0)
Add Comment