लोकांची कामं, विकासनिधीसाठी सत्तेत गेलात; आता मविआचं सरकार आलं तर? वाचा दादांचं उत्तर

Ajit Pawar: मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. आता यावेळीही तशाच घडामोडी घडणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंब एकत्र येईल, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. आता यावेळीही तशाच घडामोडी घडणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. आपण दिलेलं मत नेमकं कुठे जाणार, याचा विचार मतदार करु लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुलाखत सध्या चर्चेत आहे.

ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार गेल्याच वर्षी महायुतीत गेले. त्यांनी पक्षाचे ४० आमदार सोबत नेले. शरद पवारांची साथ सोडत सत्तेत जाताना अजित पवारांनी लोकांच्या, आमदारांच्या कामाचं, विकासनिधीचं कारण सांगितलं. कायम सत्तेत राहायची सवय असलेले अजित पवार राज्यात सत्तांतर झाल्यास काय करणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या प्रश्नाला अजित पवारांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं.
Eknath Shinde: शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; आज प्रचारात दिसला, CMकडून भरसभेत शब्द
सत्तेसोबत गेलं पाहिजे, लोकांची, आमदारांची कामं झाली पाहिजे, निधी आला पाहिजे यासाठी तुम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर तुम्ही सांगितलेलं हेच सूत्र लागू होईल का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर मी नकारात्मक विचार करत नाही. मी सकारात्मक विचार करतो. सरकार महायुतीचंच येणार, असा ठाम विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
Ajit Pawar: दादांना ‘शरद पवार पॅटर्न’ची भुरळ, लोकसभेत गाजलेला फॉर्म्युला वापरणार; बंपर यश मिळणार?
तुम्ही म्हणता तसं झालं नाही. राज्यात सत्तांतर झालंच, तर तुम्ही काय करणार, असा प्रश्न अजित पवारांना विचारला गेला. त्यावर तसा प्रश्नच येत नाही. तसं अजिबात होणार नाही. आम्ही तर तसा विचार पण केला नाही आणि त्यांचं सरकार येणार पण नाही, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar: लोकांची कामं, विकासनिधीसाठी सत्तेत गेलात; आता मविआचं सरकार आलं तर? वाचा दादांचं उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार एक्स फॅक्टर ठरु शकतात. ३० ते ३५ जागा निवडून आल्यास अजित पवारांची भूमिका निर्णायक असेल. तेव्हा काय करणार, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आम्हाला महायुतीचं सरकार आणायचंय. केंद्रात अजून साडे चार वर्ष एनडीए सरकार राहणार आहे. केंद्र सरकार राज्यांना बरीच मदत करु शकतं. वर्ल्ड बँक, झायकाकडून मदत मिळवून देऊ शकतं. कमी दरात कर्ज पुरवणाऱ्या संस्था असतात. त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पतपुरवठा करु शकतं, असं अजित पवारांनी सांगितलं.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarmaharashtra assembly electionMaharashtra Political Newsmahayuti vs mvaअजित पवारमहायुतीमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाविकास आघाडीविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment