रावणानंतर थेट भुताची उपमा अन्… बजरंग सोनावणेंची धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यातच जहरी टीका

Bajrang Sonawane attack on Dhananjay Munde at Parli: चर्चेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे. यातच लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले बजरंग सोनावणे आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. सोनावणेंनी आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड : चर्चेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे. सलग दोनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंसमोर साहेबराव देशमुखांचे आव्हान असणार आहे. तर पहिल्यांदाच या मतदारसंघातून भाजपच्या कमळ मात्र गायब झाले आहे. लोकसभा निवडणुकीतही बीड मतदारसंघात अटीतटीचा लढत रंगली होती. ज्यामध्ये बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाची धूळ चारली होती. जायंट किलर ठरलेले बजरंग सोनावणे आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. प्रचारादरम्यान ते महायुतीच्या उमेदवारांवर टीकास्त्र डागत आहेत. तर त्यांनी धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी गावभेटीदरम्यान मंत्री धनंजय मुंडेंवर बोचरी टीका केली. राक्षस रावणनंतर आता थेट भुताची उपमा देत सोनावणेंनी धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यातच हल्लाबोल केला आहे.
Ajit Pawar: प्रतिभा काकींना एक प्रश्न नक्की विचारणार! मिसेस शरद पवारांची कृती दादांच्या मनाला लागली
बजरंग सोनावणे म्हणाले, ‘हा उमेदवार पठ्ठ्या आम्ही इथंच ठेवणार आहोत. तिकडे परळी अंबाजोगाईत बघू काय ते, आम्ही आमच्या केज मतदारसंघात ते भूत येऊ देत नाही. परळी विधानसभेतील अंबाजोगाईत ही एवढी दादागिरी येऊ दिली नाही. आम्हाला ही भीती आहे की, हे भूत केज मतदारसंघात शिरेल, त्यामुळे आम्ही तिथून सुद्धा त्याला हद्दपार करून टाकलं आहे आणि आता इथे तुम्ही हद्दपार करणार आहात.’ सोनावणेंच्या या वक्तव्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘जे मतदान करत आहेत, ते तरी तुम्हाला खरं वाटतंय का, म्हणजे शाई तुमच्या बोटाला लावायची आणि बटण त्यांनी दाबायची. पण आता मी बरोबर बटणं दाबली आहेत, असे म्हणत बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Bajrang Sonawanedhananjay mundeMaharashtra vidhan sabha nivadnukncp sharad pawarparli vidhan sabhaधनंजय मुंडेंवर सोनावणे काय म्हणालेबजरंग सोनावणेंची टीकाराष्ट्रवादी शरद पवारविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीसोनावणेंकडून भुताची उपमा
Comments (0)
Add Comment