Nitin Gadkari Attack on Congress at Chandrapur rally: ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला उध्वस्त केले, त्या काँग्रेसचे राजकुमार आता लाल संविधानाची प्रत घेऊन गावोगावी फिरत आहेत, असा घणाघात नितीन गडकरींनी केला आहे.
बल्लारपूर मतदारसंघांचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज दुर्गापूर येथे नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. या सभेतून गडकरी यांनी काँग्रेसच्या राजकारणावर बोट ठेवले आहे. गडकरी पुढे म्हणाले, दलितांच्या मनामध्ये विष कालवून त्यांना भडकविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपवाले खतरनाक आहेत. ते निवडून आले तर तुम्हाला ते ‘कटवा’ देंगे. पाकिस्तानात पाठवतील. सुरक्षित राहायचं असेल तर काँग्रेसला मत द्या, अशी ओरड काँग्रेस नेहमी करीत असते. पण भारत सरकारच्या आता ६७ योजना आहेत. यापैकी एखाद्या योजनेत अशी अट आहे काय, की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करू नये? भाजपने कधीच भेदभावाचे काम केले नाही. सब का साथ सबका विकास हेच आमचे सूत्र आहे’
तर गडकरींनी ‘जो मतदान देईल त्याच काम करू, जो देणार नाही त्याचंही काम करू. जातीवादाचे राजकारण आम्ही करणार नाही, असे म्हणत मतदारांना साद घातली.