Numerology Prediction, 14 November 2024 : 14 नोव्हेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. मूलांक 2 ची धनसंपत्ती संदर्भात समस्या वाढण्याची शक्यता आहे. मूलांक 4 च्या जातकांनी काळजी घ्यावी दुखापत होण्याची शक्यता आहे. मूलांक 6 च्या लोकांचे व्यवसायाबद्दल टेन्शन वाढू शकते. मूलांक 8 च्या जातकांनी आळस बाजूला ठेवावा आणि कामाला लागावे. मूलांक 9 च्या लोकांचा राग दिवसेंदिवस वाढतो आहे तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – कटू शब्द बोलू नका, आर्थिक स्थिती उत्तम
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. व्यवसायात प्रगती असून समाजात मान प्रतिष्ठा वाढणार आहे. भावंडांसोबत बोलताना संयम ठेवावा, कटू शब्दाचा वापर करू नका अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
मूलांक 2 – धनसंपत्ती संदर्भात समस्या वाढण्याची शक्यता
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, काही कारणामुळे तुम्हाला टेन्शन येईल. धनसंपत्तीच्या बाबतीत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचे पेंडींग पेमेंट होणार आहे. तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा कारण अती राग तुमचा रक्तदाब वाढवू शकतो. संयमाने वागणे तुमच्या हिताचे आहे. शंभो महादेवाची पूजा करा, तुमच्या समस्या थोड्या कमी होतील.
मूलांक 3 – विरोधक त्रास देण्याची शक्यता, सावध राहा
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. आज कोणालाही सल्ला देण्याआधी विचार करा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा. घरातील वातावरण ठिक असेल. आर्थिक बाबतीत थोडी समस्या आहे ती हळूहळू सुधारेल. घरातून बाहेर पडताना पत्नीच्या हस्ते तिलक लावून बाहेर पडावे, समस्या कमी होतील.
मूलांक 4 – दुखापत होण्याची शक्यता
मूलांक 4 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, थोडे टेन्शन असणार आहे. अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा. आज अनेक प्रश्न एकसाथ तयार होतील त्यामुळे विचारांचा गोंधळ होवू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते शक्यतो पुढे ढकला. देवपूजा करून किंवा देवाला नमस्कार करून घराबाहेर जावे, तुम्हाला इच्छित मार्ग नक्की सापडेल.
मूलांक 5 – रागावर नियंत्रण ठेवा, अती राग हानीकारक
मूलांक 5 साठी आजचा दिवस उत्तम असून तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुम्ही जे काही काम करणार आहात ते वेळेत पूर्ण होईल. रागावर नियंत्रण ठेवा, अती राग तुमच्या तब्येतीसाठी हानीकारक आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात व्यतीत करणार आहात. जोडीदाराची तब्येत अचानक बिघडू शकते तेव्हा सावध राहा.
मूलांक 6 – व्यवसायाबद्दल टेन्शन वाढू शकते
मूलांक 6 साठी आजचा दिवस सामान्य असून व्यवसायाबद्दल काळजी वाढू शकते. तुमचे सहकारी तुम्हाला विरोधकांबद्दल भडकवू शकतात. तुम्ही संयम ठेवणे गरजेचे आहे. घरातल्यांना यथाशक्ती काही भेटवस्तू द्या त्यामुळे तुमची कामे पटापट मार्गी लागतील.
मूलांक 7 – वाहन चालवताना काळजी घ्या, दुखापतीची शक्यता
मूलांक 7 साठी आजचा दिवस थोडा अडचणींनी भरेलेला आहे. तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा. वाहन चालवताना काळजी घ्या. घरात एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते तेव्हा सावध राहा. तुमचे पैसे येणार होते पण काही कारणाने ते अडकू शकतात. जोडीदारासोबत वादविवाद करू नका.
मूलांक 8 – आळस बाजूला ठेवा, कामाला लागा
मूलांक 8 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमचे टेन्शन काही कारणाने वाढू शकते. आज काम करताना आळस जाणवेल पण आळसाला दूर करा आणि कामाला लागा. आळशीपणामुळे तुम्ही घरातील कामे देखील करणार नाही, यामुळे घरातील सदस्य नाराज होवू शकतात. काम करताना उत्साह दाखवा, तरच प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल.
मूलांक 9 – रागावर नियंत्रण ठेवा
मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला असून घरात मंगल कार्यासंदर्भात बोलणी होतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, सध्या तुमचा राग खूप वाढतो आहे. घरात वातावरण आनंदी राहील याची काळजी घ्या. बजरंगबली हनुमान यांच्या मंदिरात विडाची पान सुपारी ठेवा तुमची थांबलेली कामे मार्गी लागतील.