दादांना ‘शरद पवार पॅटर्न’ची भुरळ, लोकसभेत गाजलेला फॉर्म्युला वापरणार; बंपर यश मिळणार?

Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी वापरलेला फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत अजित पवार वापरणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना यश मिळणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: महायुतीत लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात लहान भाऊ ठरला. लोकसभेला कमी जागा घेतल्या, माघार घेतली, पण विधानसभेला तडजोड करणार नाही, असे इशारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र जागावाटपात राष्ट्रवादीला केवळ ५५ जागा मिळाल्या. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘काका पॅटर्नवर’ भर दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आहेत. तुमच्यासोबत असलेल्या आमदारांचा आकडाही तितकाच आहे. पण महायुतीत शिंदेंच्या पक्षाच्या वाट्याला ८० जागा आलेल्या आहेत. महाविकास आघाडीत शरद पवारांचा पक्ष ८० हून अधिक जागा लढवत आहेत. मग तुम्हाला मिळालेल्या जागांबद्दल समाधानी आहात का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर जागा जरी कमी मिळालेल्या असल्या, तरीही निवडून आणण्याचं प्रमाण अधिक राखण्यावर आमचा भर आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
Eknath Shinde: शिंदेंच्या बॅगांचीही तपासणी; CM म्हणतात, त्यात फक्त कपडे! युरिन पॉटवरुन ठाकरेंना टोला
आम्हाला स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आहे. उगाच दीडशे जागा घ्यायच्या आणि स्ट्राईक रेट ४० टक्के राहायचा. त्याला काय अर्थ नाही. त्यापेक्षा मर्यादित जागा घेऊन स्ट्राईक रेट जास्त राखायचा आमचा प्रयत्न आहे. स्ट्राईक रेट ६० टक्के ते ७० टक्क्यांच्या पुढे कसा जाईल त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं.
Uddhav Thackeray: मारी बिस्कीट न् खारी बिस्कीट! ठाकरेंचं भाकित २४ तासांत खरं ठरलं; महायुतीकडून ३ VIDEO शेअर
लोकसभेवेळी शरद पवारांनी वापरलेला फॉर्म्युलाच तुम्ही वापरताय. त्यांनी लोकसभेला फक्त १० जागा लढवत ८ जागा जिंकल्या होत्या. तोच फॉर्म्युला आता तुम्ही वापरत आहात का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर आता तो फॉर्म्युला त्यांनी सोडला ना. आता त्यांनी ८५ जागा घेतल्या आहेत, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.

Ajit Pawar: दादांना ‘शरद पवार पॅटर्न’ची भुरळ, लोकसभेत गाजलेला फॉर्म्युला वापरणार; बंपर यश मिळणार?

लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या. देशात एनडीएचं सरकार आलं. पण उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही. राज्यात फेक नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी झाले. आताही राहुल गांधी लाल संविधान दाखवत आहेत. ते संविधान लाल कसं झालं ते माहीत नाही, असं अजित पवार म्हणाले.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarMaharashtra Political NewsMaharashtra politicsअजित पवारएकनाथ शिंदेमहाराष्ट्र राजकीय बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशरद पवार
Comments (0)
Add Comment