स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या पर्समध्ये लिपस्टिक-लाली सापडली असेल, नितेश राणेंची बोचरी टीका

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार? निवडणूक आयोगाने लावलेले नियम सर्वांना पाळावे लागतात, असं नितेश राणे म्हणाले

Lipi

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पर्स म्हणजे बॅग तपासली, त्यात एवढं थयथयाट करण्याचं कारण काय? यांच्या पर्समध्ये लिपस्टिक लाली भेटते काय हे निवडणूक आयोग तपासत असेल. स्वतःला मर्द समजणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेत पुरुषाचे सामान आहे का, ते बघण्यासाठी ते चेक करत असतील, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्याचा प्रकार यवतमाळपाठोपाठ लातूरमध्येही घडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याही बॅगा तपासल्याचे व्हिडिओ समोर येऊ लागले.

नितेश राणे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांना अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार? निवडणूक आयोगाने लावलेले नियम सर्वांना पाळावे लागतात. आपली निवडणूक पारदर्शक होते की नाही हे पाहण्याचा अधिकार त्यांना आहे, मग ह्यांना मिरच्या का झोंबल्या. अपॉइंटमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
Uddhav Thackeray : माझं रक्ताचं नातं… शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, अमितला पाठिंबा नाही, उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका
उद्धव ठाकरेंचा एवढा तमाशा का? ते कोण मोठे लागून गेले आहेत का? अशी एकेरी टीकाही नितेश राणेंनी केली. अन्याय झाला असल्याचे संजय राऊत सांगत होते. आमच्या देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग तपासली. उद्धव ठाकरेंसारखे ते रडले नाहीत, चॉकलेट चोरल्यासारखं. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे धमक्या देत होते, उद्धव ठाकरेंच्या फिरण्यावर बंदी टाकां अशी मागणी मी निवडणूक आयोगाला करणार असल्याचंही नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane : स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या पर्समध्ये लिपस्टिक-लाली सापडली असेल, नितेश राणेंची बोचरी टीका

Worli Online Poll : ठाकरेंची धाकधूक वाढवणाऱ्या वरळीत कौल कुणाला? मटाच्या ऑनलाईन पोलचा अंदाज, युजर म्हणतात स्क्रीनशॉट काढून ठेवा
निवडणूक आयोगाचा नियम आहे मात्र उद्धव ठाकरेंची पर्स (बॅग) तपासायला नको होती. कारण त्यात लिपस्टिक लाली मिळाली असती तर… आमचा नेत्यांचा काही आक्षेप नाही ज्याला लपवायचं आहे तो थयथयाट करतो, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Maharashtra politicsnitesh rane press conferencesindhudurg newsUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे बॅग तपासणीनितेश राणेनितेश राणे उद्धव ठाकरे टीकायवतमाळ हेलिपॅड बॅग तपासणी
Comments (0)
Add Comment