वातावरण तापणार! राज्यातील सर्व पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या आजपासून नाशिक जिल्ह्यात सभा

Maharashtra Assembly Elections 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभेनंतर महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

महाराष्ट्र टाइम्सshinde thackeray new
shinde thackeray new

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधानसभेच्या प्रचाराला अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे शेवटच्या टप्प्यात नाशिकचे रण तापणार असून, आज, गुरुवारपासून (दि. १४) जिल्ह्यात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस श. प. अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभा होणार आहेत. विधानसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभेनंतर महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नाशिक दौऱ्यात दोन दिवसांत सहा मतदारसंघांत सभांचा धडाका लावत विरोधकांना घाम फोडला. आज, गुरुवारी (दि. १४) त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे नाशिक पूर्वसह चांदवड मतदारसंघात आणि बागलाण महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही आज, गुरुवारी सिन्नर, दिंडोरी, निफाड या तीन मतदारसंघांत जाहीर सभा होत आहेत.
नाशिक हादरलं! मामाच्या घरात भाचीने कवटाळलं मृत्यूला; नववीतील विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
आजच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत त्र्यबंकेश्वर येथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी जाहीर सभा होत आहे. त्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (दि. १५) जिल्ह्यातील मनमाड, मालेगाव आणि नाशिक शहरात जाहीर सभा होत आहे. याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सिडकोतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियमलगतच्या श्रीतेज बैंक्वेट हॉलमध्ये प्रचारसभा होत आहे. हे दोन्ही नेते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कन्नडमध्ये तिरंगी लढती; राजपूत राहिले बाजूला, जाधव दाम्पत्यात चुरस, पती की पत्नी कोण सरस?
शिंदे, फडणवीसांसह राज ठाकरेही रिंगणात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या १७ नोव्हेंबरला मालेगाव येथे जाहीर सभा होत आहे. याच दिवशी शिंदेंकडून नांदगाव व नाशिकमध्येही सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजता सातपूर विभागातील अशोकनगर परिसरातील जाणता राजा मैदानावर, तर सायंकाळी ७ वाजता सिडकोतील पवननगर स्टेडियमवर सभा घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. १६ रोजी मध्य व पश्चिम मतदारसंघात सभेचे नियोजन सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

devedra fadanvis speechmaharashtra assembly elections 2024maharashtra election 2024mahayuti governmentmva governmentuddhavckeray nashik sabhaएकनाथ शिंदे नाशिक भाषणनाशिक विधानसभा मतदारसंघराज ठाकरे भाषणसुप्रिया सुळे बातम्या
Comments (0)
Add Comment