Amit Thackeray on Uddhav Thackeray : मला भीषण आजार झाला होता, तेव्हा तुम्ही खोके देऊन आमचे सहा नगरसेवक चोरले, तेव्हा त्या कर्माची कुठेतरी परतफेड करायचीच आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
Amit Thackeray : माहीमची उमेदवारी मिळताच ‘मातोश्री’वरुन मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या, अमित ठाकरेंनी सगळं सांगितलं
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरेंना तुमचं तुमच्या भावांसोबत नातं कसं आहे? असा प्रश्न आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यावरुन विचारण्यात आला. त्यावर बोलताना, माझे अनेक भाऊ आहेत.. राहुल, ऐश्वर्य (स्मिता ठाकरेंचे सुपुत्र) किंवा जयदीप असेल.. पण आदित्य किंवा तेजसशी अजिबात बोलणं होत नाही, असं अमित म्हणाले.
‘मातोश्री’वरुन मोठ्या शुभेच्छा
उमेदवारी जाहीर झाल्यावर मातोश्रीवरुन शुभेच्छा मिळाल्या का? असा प्रश्न विचारला असता, शुभेच्छा मिळाल्या ना.. समोरुन उमेदवार दिला ना आम्हाला.. मोठ्ठ्या शुभेच्छा दिल्या त्यांनी, असं उपरोधिक उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं.
Worli Online Poll : ठाकरेंची धाकधूक वाढवणाऱ्या वरळीत कौल कुणाला? मटाच्या ऑनलाईन पोलचा अंदाज, युजर म्हणतात स्क्रीनशॉट काढून ठेवा
ते दरवाजे कायमचे बंद
वरळीतून आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीला उतरले, तेव्हा बोलला होतात का? असं विचारलं असता, माझं काहीच बोलणं नाहीये, २०१७ नंतर त्या दिवसापासून माझा काँटॅक्ट तुटला आणि संबंध माझ्यासाठी संपले. जुळवायला मी तरी पुढाकार नाही घेणार. लोकं बोलतात, की दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत. पण माझ्यासाठी ते दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. मीपण आजारी होतो तेव्हा, आता ते काय लेव्हलला जाऊन बोलतात, की खोके आणि आजारपण बाहेर काढतात. पण शेवटी हे कर्म असतं ना, तुम्ही पण तेच केलंत, असं अमित म्हणाले.
कर्माची कुठेतरी परतफेड करावी लागेल
मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) आजारी होते, ठीक आहे. मग माझं आजारपण हे आजारपण नाही का? मी सामान्य माणूस होतो मान्य आहे. मी आमदार किंवा मंत्री नव्हतो. पण सामान्य माणसाचं आजारपण हे आजारपण नाही का? त्यांचं दुःख हे दुःख नाही का? तर विषय सोडून देऊ. तेव्ही मी पण आजारी होतो, मला भीषण आजार झाला होता, तेव्हा तुम्ही खोके देऊन आमचे सहा नगरसेवक चोरले, तेव्हा त्या कर्माची कुठेतरी परतफेड करायचीच आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले.