Nagpur 1.35 Crores Seized : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलीस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली.
हायलाइट्स:
दुचाकीवरुन जाताना पोलिसांना संशय
बाईकला थांबवताच कोट्यवधीची रोकड जप्त
पोलिसांना वेगळाच संशय
जितेंद्र खापरे ,नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैसे जप्त करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, काल बुधवारी मोठी कारवाई करत पोलिसांनी एका दुचाकीवरून तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेतलं आहे. साकीर खान हाजी नसीर खान (वय ४२, रा. यशोधरा नगर) असं आरोपीचं नाव आहे. चौकशीदरम्यान ही रक्कम कोणाची होती, याबाबत आरोपीला माहिती देता आली नाही. प्राथमिक तपासात हवालाचा पैसा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मिळालेल्या पैशांबाबत एकच चर्चा सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलीस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. जिथे पोलिसांना १ कोटी ३५ लाख कोटी रुपये रोख सापडले. पैसे सापडताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही रक्कम कोणाची आहे? अशी विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच पैशाचे कोणतेही कागदपत्रही सादर करू शकला नाही. निवडणुकीच्यावेळी मिळालेली रक्कम पाहता पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण १ कोटी ५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. Ambulance Cylinder Explosion: दुपारी शाहांच्या ताफ्यात, संध्याकाळी बाळंतीणीला नेताना रुग्णवाहिकेत स्फोट, १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
आरोपी साकीर खान हाजी नसीर खान हा बिन्नी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. या अगोदरही त्याने बिन्नी याच्याकडे पैसे सुपूर्द केले होते. त्याने इकडून तिकडे बदली करून सोडण्याचे काम केले होते. आजही आरोपी साकीर खान हा कोणालातरी मोठी रक्कम घेऊन सोडणार असल्याची गुप्त माहिती तहसील पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. अशी माहिती मिळताच तहसील पोलिसांनी सापळा रचून रक्कम जप्त करून आरोपीला ताब्यात घेतलं.
पोलिसांकडून अशा कारवायांवर करडी नजर असताना निवडणुकीच्या वातावरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या रकमेचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. आता हा पैसा कुठे वापरला जाणार होता किंवा हा पैसा कोणाकडे पोहोचवणार होता. प्राथमिक तपासात ही रक्कम हवालाची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा