Kartik Purnima 2024 Upay :
कार्तिक पौर्णिमा हा वर्षभरातील सर्व पौर्णिमांपैकी विशेष मानला जातो. या दिवशी धनप्राप्तीसाठी सर्वात जास्त महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी सर्वांची इच्छा पूर्ण करते. यादिवशी धनप्राप्तीसंबंधित काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. जाणून घेऊया खास उपाय
१५ नोव्हेंबरला शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. शुक्रवार दिवस आल्यामुळे हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच या दिवसाचे महत्त्व देखील वाढले आहे. कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते. तसेच संपूर्ण वैकुंठलोकात या उत्सवाचे वातावरण असते. त्यामुळे या सणाला देव दिवाळी असेही म्हणतात.
या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्याने प्रभाव दिसून येतात. तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे जाणून घेऊया.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर दुधात पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करुन पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. तसेच घराच्या मंदिरात देखील तुपाचा दिवा लावून श्रीसुक्ताचे पठण करा
गाईची सेवा केल्याने मिळेल पुण्य
कार्तिक पौर्णिमेला गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच गाईची सेवा करा. या दिवशी सर्व देव उत्सव साजरा करतात. गाईमध्ये सर्व देवी-देवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी गाईची सेवा केल्याने सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी गाईच्या वासराला दूध पाजल्याने पुण्य मिळते.
या ५ वस्तू दान केल्याने देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन दानधर्म करण्याची पद्धत आहे. या दिवशी दूध, दही, तुप, साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभही होतो. तुमची प्रगती आणि आर्थिक स्थितील समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात.
ईशान्य भागात दीवा लावा
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात संध्याकाळी घराच्या ईशान्य कोन्यात तुपाचा दिवा लावायला हवा. हा दिवा रात्री किमान १२ वाजेपर्यंत जळत ठेवावा. घराचा हा ईशान्य कोपरा देवी लक्ष्मीचे स्थान मानला जातो. या कोपऱ्या देवी लक्ष्मीची सावली राहाते. तसेच तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. उत्पन्नाते स्त्रोत वाढतील.
देवी लक्ष्मी नैवेद्य अर्पण करा
देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी. ही खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यातील काही भाग ब्राह्मणांना दान द्यावा. तसेच प्रसाद म्हणून इतरांना वाटावा. असे केल्याने घरात धनसंपत्ती वाढते. संपूर्ण कुटुंब सुखी राहते.