Kartik Purnima 2024 :
यंदा कार्तिक पौर्णिमा ही १५ नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे. ग्रहांच्या संयोगाने यावेळी गजकेसरी राजयोगचा शुभ संयोग घडून आला आहे. आर्थिक समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर गजकेसरी योग अत्यंत प्रभावी मानला जातो.या शुभ योगामध्ये कर्क आणि तूळ राशीसह 5 राशी भाग्यवान ठरतील. या शुभ योगामध्ये कोणत्या 5 राशींवर लक्ष्मी धनाचा वर्षाव करणार आहे ते पाहूया.
कार्तिक पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुभ मानला जातो. यावेळी कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी आली आहे. तसेच गजकेसरी राजयोग जुळून आला आहे. या दिवशी शनि देखील कुंभ राशीत मार्गीक्रमण करणार आहे. याशिवाय चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये राशी परिवर्तन योगही तयार होत आहेत. अनेक शुभ योग एकत्रितपणे तयार होत असल्याने कार्तिक पौर्णिमेचा सण विशेष बनत आहे. या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीची कर्क राशीसह ५ राशींवर कृपा राहिल
वृषभ – नवीन संधी मिळेल
या काळात करिअरला नवीन दिशा मिळेल. तुमच्या भाग्यवृद्धीमुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन तंत्रज्ञान किंवा कल्पनांसाठी तुम्ही विचार कराल. व्यावसायिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्याच्या संधी मिळतील. अचानक अडकलेले पैसे मिळतील.
कर्क – उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील
तुम्हाला नवीन कल्पना आणि तुमची उत्सुकता वाढवणारे अनुभव शोधण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन दृष्टीकोन तुम्हाला स्विकारावा लागेल. अनेक स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. करिअरमध्ये नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील
तुळ – संयम ठेवा
लेखानाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे. कुटुंबातील लोकांच्या आनंदात वाढ होईल. नात्यात संयम ठेवावा लागेल. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असेल. प्रमोशन मिळेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील.
धनु – प्रगतीचे मार्ग खुले होतील
धनु राशीच्या लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही इतरांबद्दल अधिक सहमत, सहकार्यशील असाल. तुमच्या आकर्षक गुणांसह पुढे येऊन संधी मिळेल. इतरांना कमी लेखू नका. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील. जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील.
कुंभ – घाईने निर्णय घेणे टाळा
देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यावसायिक जीवन सुधारेल. समाजात तुमचे नाव चांगले होईल. तुमचे आकर्षण आणि सामाजिक कौशल्यात लक्षणीय वाढ होईल. मौजमजेसाठी फिरायला जाल. आत्म-नियंत्रण आवश्यक आहे. करिअरमध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळा.