महायुतीला धक्का, विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; सर्व्हेतून आकडे समोर

Maharashtra Election Survey: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात सुरु आहे. मतदानाला केवळ ५ दिवस राहिलेले असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले असताना लोकपोलनं केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज समोर आलेले आहेत. महाविकास आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज लोकपोलनं वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळतील. तर महायुतीला ११५ ते १२८ जागांवर यश मिळेल, असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला झालेल्या मतदानात फारसा फरक नव्हता. पण विधानसभेला चित्र वेगळं दिसेल असा अंदाज आहे. महायुतीला ३७ ते ४० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला ४३ ते ४६ टक्के मतं मिळू शकतात. तर अन्य पक्षांना १६ ते १९ टक्क्यांसह ५ ते १४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
Radhakrishna Vikhe Patil: राहुल गांधींचा ‘तो’ सल्ला न् मी भाजपमध्ये गेलो; शरद पवारांचं नाव घेत विखेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं होतं. तर मविआनं ३० जागा खिशात घातल्या होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थिती पाहिल्यास लोकसभेला मविआनं १५३ जागांवर आघाडी घेतली होती, तर महायुती १२७ जागांवर पुढे होती. आता विधानसभेलाही तसाच निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. लोकपोलच्या सर्व्हेनुसार मविआला १५१ ते १६२ आणि महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. लोकपोलनं महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात, त्यांना किती टक्के मतदान होऊ शकतं, याची आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. पण लोकपोलनं पक्षनिहाय अंदाज जाहीर केलेले नाहीत. महायुतीत सर्वाधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि मविआला सर्वाधिक नुकसान ठाकरेंच्या शिवसेनेचं होऊ शकतं, असं लोकपोलचं सर्वेक्षण सांगतं. याचा अर्थ लोकसभा निकालाचीच पुनरावृत्ती विधानसभेलाही होईल, अशी दाट शक्यता आहे. प्रत्येक मतदारसंघातील जवळपास ३०० जणांनी बोलून लोकपोलनं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत एकूण ८६ हजार ४०० नागरिकांचा सहभाग होता.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpmaharashtra assembly electionMaharashtra Political Newsmva vs mahayutishiv senaमहायुतीमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाविकास आघाडीलोकसभा निवडणूकविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment