Today Panchang 15 November 2024 in Marathi: शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २४ कार्तिक शके १९४६, कार्तिक पौर्णिमा उत्तररात्री २-५८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी रात्री ९-५५ पर्यंत, चंद्रराशी: मेष उत्तररात्री ३-१६ पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा
भरणी नक्षत्र रात्री ९ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग सकाळी साडे सात वाजेपर्यंत त्यानंतर वरियान योग प्रारंभ, विष्टी करण संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४७
- सूर्यास्त: सायं. ५-५९
- चंद्रोदय: सायं. ५-२८
- चंद्रास्त: पहाटे ५-५५
- पूर्ण भरती: सकाळी १०-५१ पाण्याची उंची ४.२८ मीटर, रात्री ११-५२ पाण्याची उंची ४.९७ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५५ पाण्याची उंची १.४५ मीटर, सायं. ५-१० पाण्याची उंची ०.०६ मीटर
- सण आणि व्रत : त्रिपुरारी पौर्णिमा, श्री गुरुनानक जयंती, महालय समाप्ती, तुलसी विवाह समाप्ती.
- कार्तिकस्वामी दर्शन : रात्री ९.५५ ते उत्तररात्री २.५८
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५८ मिनिटांपासून ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांपासून ते ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून ४४ मिनिटांपासून ते ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
लक्ष्मी नारायण यांची विधीवत पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त)