School 3 Days Holiday Vidhan Sabha Nivadnuk : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यावर उत्तर देत शासनाने याबाबतच्या निर्णयाचे अधिकार मुख्यध्यापकांना दिले आहेत.
या प्रस्तावानुसार, राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरुन घ्या. तसंच आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असं सांगण्यात आलं आहे.
शाळांना सुट्टी द्यावी की नाही? मुख्यध्यापकांकडे निर्णयाचे अधिकार
शिक्षण आयुक्त कार्यालयाने शाळांना सुट्टीचा प्रस्ताव दिला होता. त्याला सरकारने मान्यता देत, शाळांना सुट्टी द्यावी की नाही हे अधिकार मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आपल्यानुसार आपल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.