Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम हा त्यांच्या मत्यू झाल्याची खात्री करायला लीलावती रुग्णालयात गेला होता. तो जवळपास अर्धा तास रुग्णालयाजवळच होता.
हायलाइट्स:
- बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
- शूटर शिवाच्या चौकशीत मोठी अपडेट
- शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्य शूटर शिवकुमारने एक धक्कादायक खुलासा केला होता. तो म्हणाला की, ”हत्येसाठी सर्व शूटरला हँडलरने शस्त्रे पुरवली होती. हेच नाही तर तिघांचे देखील हॅण्डलर वेगळे होते. घटना घडेपर्यंत ते एकमेकांना ओळखतही नव्हते. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर तिघांनाही वेगळे व्हायचे होते. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी परत ते जम्मू कश्मीर येथे भेटणार होते”. शिवाने चौकशीमध्ये सांगितले की, ”लॉरेन्स बिश्नोईसाठी शुभम लोणकर हा काम करतो. शुभम हा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असतो. शूटरची खाण्याची राहण्याची सर्व व्यवस्था शुभम लोणकर हाच बघतो.
शिवाने पोलिसांना सांगितले, हत्या झाल्यानंतर तिघांनाही वेगळे होऊ १२ ऑक्टोबरला वैष्णोदेवी मंदिराजवळ भेटण्यास सांगितले होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हे सर्वजण नेपाळला जाणार होते. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अजूनही काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.