Shani- Surya Yuti Horoscope :
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीनंतर सूर्याचे संक्रमण वृश्चिक राशीत होणार आहे. १६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत संक्रमण करेल. या संक्रमणामुळे शनीवर सूर्याची प्रतिगामी दृष्टी राहिल. ज्योतिषशास्त्रात शनि आणि सूर्याचे संबंध फारसे चांगले सांगितले जात नाही. या शत्रूग्रहांमुळे कुंभसह कोणत्या राशींना नुकसान होणार आहे जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीनंतर सूर्याचे संक्रमण वृश्चिक राशीत होणार आहे. १६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत संक्रमण करेल. या संक्रमणामुळे शनीवर सूर्याची प्रतिगामी दृष्टी राहिल.
सूर्यावरील शनिची प्रतिगामीदृष्टी अनेक राशींसाठी खूप त्रासदायक असेल. शनिच्या प्रतिगामीमुळे अनेक राशींना नुकसान होण्याची शक्यता आहे. करिअरपासून कौटुंबिक जीवनातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. ज्योतिषशास्त्रात शनि आणि सूर्याचे संबंध फारसे चांगले सांगितले जात नाही. या शत्रूग्रहांमुळे कुंभसह कोणत्या राशींना नुकसान होणार आहे जाणून घेऊया.
मेष राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीवर शनिची तिसरी दृष्टी असेल. या काळात कुटुंबासोबत तुमचे संबंध बिघडतील. भावासोबतच्या नात्यात वाद होतील. कुटुंबात मतभेद वाढण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. जोडीदारासोबतचे नाते बिघडेल.
वृषभ राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
वृषभ राशीच्या लोकांवर सूर्याची सातवी दृष्टी असेल. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहित लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. नात्यात चढ- उताराचा सामना करावा लागेल. प्रवास फलदायी ठरणार नाही. नोकरदार लोक आणि कामाच्या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ विरोधात जाण्याची शक्यता आहे. काम अत्यंत सावधगिरीने करा. जोडीदाराशी मतभेद वाढतील.
सिंह राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
सूर्य संक्रमणादरम्यान शनिची सिंह राशीवर सातवी दृष्टी असेल. कौटुंबिक वाद आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. थोडा संयम ठेवणे देखील गरजेचे आहे. सहकाऱ्यांसोबत नाते सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांना फारसा फायदा होताना दिसणार नाही. संपत्तीचा वाद सुरु असेल तर दूर राहा.
वृश्चिक राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
सूर्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीवर शनीची दहावी दृष्टी राहिल. तुम्हाला अत्यंत सावधगिरीने काम करावे लागेल. अधिकाऱ्यांकडून खूप त्रास होऊ शकतो. नोकरी बदलताना सावध राहा. कामात अधिक संघर्ष करावा लागेल. निर्णय घेताना संयम आणि शहाणपणाने घ्या. वडिलांसोबतचे नाते बिघडेल.
कुंभ राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
कुंभ राशीवर सूर्याची चौथी दृष्टी असेल. तुम्हाला मालमत्तेच्या बाबतीत सावध राहावे लागेल. मालमत्तेशी संबंधित लक्षणीय वाद होतील. सरकारी क्षेत्रातील कामात अडचणी येऊ शकतात. विद्युत उपकरणे इत्यादींवर खर्च करावा लागेल. इच्छा असूनही बचत करता येणार नाही. व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागेल.