Shani Margi 2024 Kumbh :
ज्योतिषशास्त्रानुसार शनि आजपासून त्याच्या मूळ राशीत अर्थात कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनिच्या मार्गीक्रमणामुळे शुभ प्रभाव वाढेल. तसेच या काळात शश राजयोगाचा शुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या मार्गीक्रमणामुळे फायदा होईल. या राशींसाठी चांगले दिवस सुरु होतील. तसेच आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. शनीच्या थेट हालचालीचा मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर परिणाम होईल जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. शनि ग्रह एकाच राशीत सुमारे अडीच वर्षे संक्रमण करतो. त्यामुळे शनि शुभ आणि अशुभ योग निर्माण करतो. प्रतिगामी तर कधी सरळ मार्गी फिरतो. नवीन वर्ष सुरु होण्याआधी शनी कुंभ राशीत मार्गीक्रमण झाल्यामुळे शुभ परिणाम देईल. वर्षाच्या शेवटी वृश्चिक, कुंभसह अनेक राशींसाठी प्रगतीचे मार्ग खुले करेल. जाणून घेऊया शनिचा १२ राशींवर कसा परिणाम होईल त्याविषयी
मेष राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
मेष राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. व्यवसायात नवीन कल्पनांद्वारे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.
वृषभ राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
शनि मार्गीमुळे वृषभ राशीच्या करिअरमध्ये जबरदस्त यश मिळेल. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल. शनि प्रत्यक्ष मार्गी झाल्यामुळे व्यवसायात लाभ होऊन उत्पन्नात वाढ होईल. आरोग्य देखील चांगले राहिल. करिअरच्या दृष्टाने तुम्हाला फायदा होईल.
मिथुन राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
मिथुन राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या शौर्यात वाढ होईल. शत्रूंवर विजय मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान मिळेल. यासोबतच तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळेल.
कर्क राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिचे प्रत्यक्ष लाभदायक ठरेव. लोखंड, तेल किंवा मद्य यांसारख्या क्षेत्रात व्यापर करत असाल तर खूप फायदा होईल. या काळात तुम्हाला व्यवसायाच्या नवीन ऑर्डर मिळतील. व्यवसायात सतत फायदा होईल. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.
सिंह राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
सिंह राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव दिसून येईल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्हाला या वेळी भरपूर साधनांचा लाभही मिळेल. वैवाहिक जीवानत येणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. आर्थिक क्षेत्रात प्रगती अपेक्षित आहे. न्यायलयीन प्रकरणांमध्ये फायदा होईल.
कन्या राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
कन्या राशीच्या लोकांना जुन्या कर्जापासून मुक्ती मिळेल. या काळात तुम्ही जुन्या आजाराने त्रस्त असाल तर त्यातून आराम मिळेल. या राशीच्या लोकांना कोर्टाच्या वादात यश मिळेल. आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. मुलांच्या दृष्टीकोनातून शनि तुम्हाला काही चिंता देऊ शकतो.
तुळ राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
तुळ राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. शनिचा बुध-शुक्रशी संबंध आल्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नशीब तुमच्या पाठीशी राहिल. व्यापारातील लोकांना सावधगिरीने राहायला हवे. मुलांची थोडी काळजी घ्यायला हवी.
वृश्चिक राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
तुम्हाला मोठे पद आणि अधिकार प्राप्त होतील. वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. या काळात तुम्हाला अनेक क्षेत्रात फायदा होईल. तुमच्या शरीराचे आरोग्य खूप चांगले राहिल.
धनु राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
धनु राशीच्या लोकांच्या अडचणी संपतील. शनीची साडेसाती संपल्याने तुमच्या मनातील सर्व चिंता दूर होतील. हा काळ प्रवासी उद्योग करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला काही चांगल्या योजनांमध्ये यश मिळेल. लोखंडी वस्तूच्या व्यापारात कमाई कराल. तणाव निर्माण होऊ शकतो.
मकर राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु होईल. या काळात तुमच्या जीवनात काही सकारात्मक परिणाम होतील. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या काळात यश मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रगतीसाठी थोडा संघर्ष करावा लागेल.
कुंभ राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
कुंभ राशीत शनीचे मार्गीक्रमण झाल्यामुळे फायदा होईल. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. शश राजयोगाचा फायदा होईल. तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. व्यापार- व्यवसायाच्या क्षेत्रात किंवा पार्टनरशीपमध्ये आर्थिक लाभ होतील.
मीन राशीवर शनि मार्गीचा प्रभाव
मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. या काळात तुमची कमाई जास्त होणार नाही. खर्चात वाढ होऊ शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात तणावपूर्ण संबंध असू शकतात. नवीन ठिकाणी नवीन बदल होऊ शकतात, फायदे दिसून येतील. तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, आजारपणामुळे तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतील.