पंतप्रधान मोदी सारखे परदेशात का जातात? खासकरुन रशियाला, भरसभेत संजय राऊतांचा मिश्कील सवाल

Sanjay Raut attack on BJP PM Modi: आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात उपस्थिती लावलेल्या खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

Lipi

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. यातच आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात उपस्थिती लावलेल्या खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे परदेशात का जातात, खासकरून ते रशियाला का जातात? यावर मला प्रश्नच पडतो,’ असा मिश्किल सवाल उपस्थित करत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. तसेच ‘जसे पुण्यात कोयता गँग आहे, तसेच राज्य सरकारमध्येही कोयता गँग आहे. महाविकास आघाडीने एकत्र येऊन या गँगला संपवायचे आहे,’ असेही संजय राऊत म्हणाले.

शुक्रवारी कोथरूड, शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कोथरूडमध्ये प्रचार सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या नेत्यांना धारेवर धरले. ‘चंद्रकांत मोकाटे हे भूमिपूत्र आहेत. आता तुम्ही ठरवा, भूमिपुत्राला मतदान करायचे की बाहेरून आलेल्या पार्सलला परत पाठवायचे,’ असे देखील राऊतांनी म्हणाले.

शिवाजीनगरमध्ये त्यांनी भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर निशाणा साधत, ‘विसरू नका, भांडणात आणि फोडाफोडीत आमचा शिवसैनिक अभिषेक गेला आहे,’ असे सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले, ‘श्रीमंतांच्या गाड्यांखाली गरिबांच्या मुलांना चिरडले जाते, आणि आमदार त्या श्रीमंतांना वाचवण्यासाठी काम करतात. या महाराष्ट्राचे दोनच दुष्मन आहेत, एक मोदी आणि दुसरे शहा. सगळे ईडी-सीबीआयला घाबरतात, मग ते एकनाथ शिंदे असोत की अजित पवार. ते सगळे भित्रे आहेत,’ अशी जहरी टीका करत यंत्रणांच्या चौकशीचा मुद्दा राऊतांनी पुन्हा गिरवला आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Maharashtra vidhan sabha nivadnukpune vidhan sabharaut on pm modi bjpSanjay Rautshivsena ut in puneपुण्यातील राजकारणराऊत मोदींवर काय म्हणालेविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीशिवसेना ठाकरे गटाची ताकदसंजय राऊतांची टीका
Comments (0)
Add Comment