Maharashtra Assembly Election 2024: बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. आंबेडकरांचा काँग्रेसने पराभव केला होता म्हणून अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचे शिंदे म्हणाले.
नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांच्या या अजब वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. यावेळी खासदार अशोक चव्हाण, आमदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे उमेदवार आनंद बोढारकर यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात गेले. त्यांनी काँग्रेस का सोडली हा प्रश्न अनुत्तरीत होतं, मात्र काही दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत काँग्रेसच्या त्रासामुळे मी पक्ष बदललो असं म्हणाले. त्यानंतर आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलाचा मुद्दा उपस्थित करून त्यांना या ना त्या विषयावरून चिमठा काढला. संविधाना वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
संविधाना बाबत काँग्रेस अपप्रचार करत आहे. पण बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान कोणी ही बदलू शकणार नाही असं शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला आहे. राज्यातील महायुतीची सरकार विकासा सोबतच कल्याणकारी निर्णय घेतले आहे. मनमोहनसिंघ यांनी आपल्या कार्यकाळात २ लाख कोटी रुपये दिले होते, मात्र नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटी रुपये दिले असं शिंदे म्हणाले.
राज्यात लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता राहुल गांधीही म्हणतात महिलांच्या खात्यावर खटाखट पडणार पण, त्यांचे काहीच पडणार नाही. कर्नाटक, तेलंगणात नुसत्या घोषणा केल्या. त्यांच्याकडे योजनेसाठी पैसे नाहीत, ते पंतप्रधानांकडे मागतात. विरोधकांची नुसती घोषणा आहे. उलट या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेलेल्यांना या निवडणूकीत बहिणी त्यांची जागा दाखवणार आहेत. कोणाचाही माईका लाल आला तरी, लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.