शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोज उठून भोंगा घेऊन… देवेंद्र फडणवीस हे काय बोलून गेले?

Devendra Fadnavis attack on sharad pawar and supriya sule: अलीकडच्या काळात आमचे पवार साहेब आणि सुप्रियाताई हे जणूकाही गुजरात राज्याचे राजदूत म्हणूनच काम करत आहेत, अशा शब्दांत फडणवीसांनी पवार बापलेकीवर निशाणा साधला.

Lipi

पुणे : खडकवासल्यातील महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली. यावेळी फडणवीसांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेवरुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘अलीकडच्या काळात आमचे पवार साहेब आणि सुप्रियाताई हे जणूकाही गुजरात राज्याचे राजदूत म्हणूनच काम करत आहेत. रोज उठून सांगतात आमचे उद्योग गुजरातला चालले. म्हणजे गुजरात सरकारला जाहिरात करायची आता गरजच नाहीये. शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोज उठून भोंगा घेऊन त्यांच्याबद्दल सांगत असतात,’ अशा शब्दांत फडणवीसांनी पवार बापलेकीवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस सुप्रिया सुळेंना लक्ष्य करत म्हणाले, सुप्रियाताई लक्षात ठेवा २०१५ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र नंबर १ होता. २०१९ला बेईमानी झाली आणि तुमचं मविआ सरकार आलं त्यानंतर महाराष्ट्र ४ नंबरला गेला. अहो सुप्रियाताई देशात जेवढी गुंतवणूक आली, त्यातील ५२ टक्के एकट्या महाराष्ट्रात आले. सुप्रियाताईंना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना महाराष्ट्राचं भलं पाहवत नाही.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोज उठून भोंगा घेऊन… देवेंद्र फडणवीस हे काय बोलून गेले?

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, जेव्हा लाडकी बहीण योजना आणली. त्यावेळी ठाकरे गटाचे लोक, शरद पवार गटाचे लोक आणि काँग्रेसचे लोक सारखे म्हणत होते की, योजना येणारच नाही. त्याची अंमलबजावणी कशी होईल तेव्हा त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर पर्यंत पैसे भरून टाकले. तसेच फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेच्या याचिकेवरुन मविआवर पुन्हा निशाणा साधला, ‘आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ आहोत, तसे तुमचे सावत्र भाऊ काही मार्केटमध्ये फिरत आहेत. तुमच्या या सावत्र भावांनी हायकोर्टात याचिका केली. नाना पटोलेंचा अधिकृत निवडणूक प्रमुख त्याचा पिटीशनर आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.

उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसने आता लांगुलचालन सुरू केले आहे. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाहीत जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्या मुस्लिम बहिणींसाठी देखील केली. पण काही पक्ष जर मतांच्या नावावर ध्रुवीकरण करत असतील तर मी तुम्हाला जागा करायला आलो आहे. असे फडणवीस म्हणाले. तर ‘उलेमा कौन्सिलने १७ मागण्या महाविकास आघाडीला दिल्या आहेत त्यातील काही मागण्या इतक्या खतरनाक आहेत. त्यातील एक म्हणजे मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण द्या. या सगळ्या १७ मागण्या या पक्षांनी लिहून दिले की आम्हाला या मागण्या मान्य आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Devendra Fadnaviskhadakwasla vidhan sabhaMaharashtra vidhan sabha nivadnuksharad pawar ncpSupriya Suleखडकवासला विधानसभेतील राजकारणदेवेंद्र फडणवीसांचे भाषणविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीशरद पवारांची राष्ट्रवादीसुप्रिया सुळेंवर टीका
Comments (0)
Add Comment