Sharad Pawar: गडहिंग्लज येथे झालेल्या सभेत शरद पवारांनी कागल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका
कागल विधानसभा मतदारसंघात यंदा हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा हाय प्रोफाईल सामना पाहायला मिळत आहे. यासाठी समरजीत घाटगे यांच्या प्रचाराला शरद पवार यांनी आज गडहिंग्लज येथे हजेरी लावली यावेळी बोलताना गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक जण आम्हाला सोडून गेले दुर्दैवाने यात तुमच्याही जिल्ह्यातला एक व्यक्ती आहे.
खरं तर आपल्या हातातील सत्ता लोकांसाठी वापरायची असते. ते करत असताना जात-पात, धर्म बघायचा नसतो ही शिकवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिली आहे. आम्ही ताकद देत असताना कोण कुठल्या जातीचा धर्माचा आहे. याचा कधीच विचार केला नाही. यातूनच हसन मुश्रीफ यांचं नाव समोर आले होत. अनेक वर्ष मी त्यांना साथ दिली, शक्ती दिली. त्यांच्यासाठी सभा घेतल्या मंत्री केले. हा कोल्हापूरचा आणि लहान समाजातला आहे. कष्ट करायची तयारी आहे म्हणून आम्ही त्यांना अनेकदा संधी दिली. मात्र त्यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या.
यानंतर हसन मुश्रीफ एक दिवस माझ्याकडे आले आणि मला म्हणाले आम्ही चाललोय. आमच्यासोबत चला. ज्यांच्या विरोधात लोकांनी तुला मतं दिली त्यांच्यासोबत कशासाठी जायचं? हाच एक प्रश्न मी त्यांना विचारला होता. यावर हसन मुश्रीफ मला कानात येऊन म्हणाले होते, आम्ही हा निर्णय घेतला नाही तर तुरुंगात जावं लागेल. ईडीच्या भीतीने आणि तुरुंगात जाऊ लागू नये म्हणून या लोकांनी हा सगळा उद्योग केला मात्र आता यांना धडा शिकवायला हवा असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी तर जाहीर सांगितलं आहे. एकदा तुरुंगात जाऊन आलोय. आत्ता भाजपसोबत गेलो नसतो तर पुन्हा तुरुंगात जावं लागलं असतं. ज्यांचे हात बरबटलेले असतात, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच अशी भीती असते. माझ्यावर देखील ईडीकडून कारवाईचा प्रयत्न झाला होता. मात्र मी स्वतः ईडीकडे गेलो अस शरद पवार म्हणाले.
कागल आणि महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही
दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती हे देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून आज गडिंग्लजमध्ये समरजीत सिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी सुद्धा उपस्थित राहिले. यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी चांगली विरोधकांवर जोरदार टीका करताना समरजीत सिंह घाटगे यांचे देखील कौतुक केला आहे. कागल आणि महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्र जनता परिवर्तन नक्की करेल ही शंका नाही.
मी पुरोगामी आहे असं काही जण म्हणत होते, मात्र फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सोडून गेले ही लढाई विचारांची आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने घ्यायचं काम काहीजण करत आहेत. पूर्वी महाराष्ट्र देशात 1 नंबर वर होत मात्र आता खाली गेल आहे. यामुळे महाविकास आघाडीच सरकार आणून राज्य पुन्हा 1 नंबर ला घेऊन जायचं आहे. यासाठी आपल्याला समरजीत घाटगे यांचे हात बळकट करायच आहे.
समरजीत घाटगेमुळे संपूर्ण गणितच बदलल
समरजितसिंह घाटगे कोणतेही पद नसताना सातत्याने काम करत आहेत. त्यांनी अनेक मंजुरी आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक केले पाहिजे. शाहू महाराज पुढे म्हणाले की ते स्वतः सीए असल्याने त्यांना गणित चांगलं कळत. कागलमध्ये लोकसभेला विरोधकाने म्हटलं होते की शाहू महाराजांवर दोन लाखांचे लीड असेल. मात्र विरोधकांची सगळी गणिते बिघडली. आता तर समरजीत घाटगे आमच्या सोबत आले आहेत त्यामुळे येथील संपूर्ण गणितच बदलल आहे. आता आपल्याला महाराष्ट्र खंडणी मुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करायच. आहे असे ही खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले आहेत.