Maharashtra Assembly Election 2024: सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
तालुक्यातील सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मुंडे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनंती केल्याने महायुतीचा धर्म म्हणून मी ही सभा घेतली आहे. लोकसभेत आमच्या उमेदवाराला पराभूत केले, पण आता आपल्याला मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास करायचा आहे, म्हणून महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. दिवंगत गोपिनाथ मुंडे हे अनेक खासदार-आमदार निवडून आणायचे.
तुमच्यात कुवत असेल तर युतीच्या उमेदवाराला माझ्यासाठी मतदान करा. आमच्या सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांना १५०० आणि शेतकऱ्यांना वर्षभरात १८ हजार रुपये देणाऱ्या योजना दिल्या आहेत. यापुढेही या योजनांच्या निधीत वाढ होईल. त्यासाठी आमचे उमेदवार निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी केले. यावेळी उमेदवार बनकर यांनी गोदाकाठ भागात केलेली विकासकामाची माहिती दिली. राजेंद्र डोखळे, यतीन कदम, बाळासाहेब क्षीरसागर, शंकरराव वाघ, जगन कुटे, वैकुंठ पाटील, शिवनाथ कडभाने आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिडकोत कार्यकर्ते तीन तास ताटकळले
सिडको : सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथील मैदानात महायुतीच्या नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजेपासून कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राजे संभाजी स्टेडियमवर मुंडेंचे हेलिकॉप्टर उतरणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे सायखेडा येथे त्यांचे हेलिकॉप्टर लँड झाल्याने सभेला तब्बल तीन तास विलंब झाला. अखेर कार्यकत्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. दुपारी तीननंतर भोळे मंगल कार्यालयात सभेऐवजी मेळावा झाला. त्यामुळे पदाधिकारी-कार्यकत्यांचा हिरमोड झाला.