Maharashtra Assembly Election 2024: पूर्व विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर शुक्रवारी जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
पूर्व विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर शुक्रवारी जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, बल्लापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यासह देवराव भोंगळे, करण देवतळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, हरीश शर्मा व महायुतीच्या घटक पक्षांतील प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
शहा म्हणाले, मोदींनी देशाला समृद्ध करण्याचे काम केले. देशाचा सन्मान जागतिक पातळीवर वाढविला. महाराष्ट्राच्या विकासासाठी १५ लाख कोटी रुपये दिले. अनेक महत्त्वपूर्ण योजना आणण्याचे कामदेखील केले गेले. येत्या काळात महाआघाडीमुळे महाराष्ट्राचा गेलेला गौरव पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम करू, असे आश्वासनही दिले. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, धारशीव, अहिल्यादेवीनगर असे शहरांचे नामकरण केले. अनेक विकासात्मक कामे केली. या प्रत्येक कामांना उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षाने विरोध केला. मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर बनविले, ३७० कलम हटविण्याचे काम केले, तीन तलाक हटविले, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवाजी महाराजाच्या पावलांवर चालणारे सरकार हवे की, ‘औरंगजेब फॅन क्लब’चे सरकार हवे अशी विचारणा करीत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
पाच मिनिटांचे भाषण…
अमित शहा यांची सभा नियोजित वेळेपेक्षा थोडी उशिरा सुरू झाली. त्यामुळे सुरुवातीला जनतेची माफी मागितली. सायंकाळी पाच वाजतापूर्वी हेलिकॉप्टरने निघायचे असल्याने त्यांनी अपघ्या पाच मिनिटांत आपले भाषण पूर्ण केले. सोबतच उर्वरित सभा सुरू राहणार असल्याचेही नमूद केले.