Mumbai Local Mega Block: ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वे
■ स्थानक – माटुंगा ते मुलुंड
■ वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५
■ मार्ग अप आणि डाउन धीमा
■ परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वे
■ स्थानक – कुर्ला ते वाशी
■ वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
मार्ग -अप आणि डाउन
■ परिणाम सीएसएमटी ते – वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे.
पश्चिम, हार्बरवर आज १२ तासांचा ब्लॉक
जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पुलाचा गर्डर पुन्हा बसवण्यासाठी धीमी अप-डाउन आणि हार्बर अप-डाउन रेल्वेमार्गावर पश्चिम रेल्वेने १२ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ११.३० पर्यंत पुलासंबंधित कामे सुरू राहणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे.
स्थानक : जोगेश्वरी ते गोरेगाव मार्ग धीमा
अप-डाउन, हार्बर
अप-डाउन वेळ : शनिवार रात्री ११.३० ते रविवार सकाळी ११.३०
ब्लॉकमुळे होणारे मुंबई लोकलवरील परिणाम
अंधेरी आणि गोरेगाव / बोरिवलीवरील अप-डाउन धीम्या
मार्गावरील लोकल अप-डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
■ राम मंदिर स्थानकात जलद मार्गावरील फलाट नसल्याने कोणतीही लोकल उपलब्ध होणार नाही.
■ मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्या अंधेरी स्थानकापर्यंतच धावतील आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू करतील.
■सर्व मेल-एक्स्प्रेस २० मिनिटांहून अधिक वेळ विलंबाने धावणार आहेत.
■अनेक लोकल रद्द राहणार असून, अनेक विलंबाने धावणार आहेत.
■ ब्लॉकची सविस्तर माहिती सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे