प्रतिभा काकींबाबत अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचे उत्तर, एका वाक्यात विषय संपवला…

Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यात शेतकरी नाराज आहेत. बेरोजगारीमुळे तरुण वर्गातही निराशा आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल, पण अपेक्षित परिणाम होणार नाही. मी अनेक पंतप्रधान पाहिले पण नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान कधीच पाहिला नाही.

हायलाइट्स:

  • प्रतिभा काकींबाबत अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचे उत्तर
  • एका वाक्यात विषय संपवला…
  • राज्यात शेतकरी नाराज आहेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शरद पवार ऑन अजित पवार

पुणे : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहेत. यापैकी बारामती मतदासंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पवार कुटुंबातील काका-पुतण्याच्या लढतीमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार गटाकडून उभे असलेल्या युगेंद्र पवारांसाठी आता शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार या देखील प्रचारासाठी उतरल्या आहेत. यावर अजित पवारांनी नाराजीही व्यक्त केली आहे. कधीतरी त्यांना भेटल्यावर मी हे विचारणार आहे की माझ्यात असं काय कमी होतं? अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.अजित पवारांनी प्रतिभा काकींबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांनी अखेर उत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलते होते. ”प्रतिभा पवार अनेकदा प्रचारात सहभागी झाल्यात. त्या आलेल्या आहेत, अनेकदा आलेल्या आहेत. माझ्या घरचे सगळेजण प्रचाराला आलेले आहेत”, असं उत्तर पवारांनी दिलं आहे. महिलांना ५०० रुपये देऊन बारामतीत आणलं जातंय, असा आरोप अजित दादांकडून केला जातोय. यावर शरद पवार म्हणाले की, ”बारामतीत मी अजून सभा देखील घेतली नाही आणि गेलेलो देखील नाहीय”, अशा एका वाक्यात उत्तर देऊन पवारांनी तो आरोप धुडकावून लावला.
Uddhav Thackeray : भाजपमधील मायलेकाची जोडगोळी ठाकरे गटात, एक लाख मतं घेणारा वंचित नेताही शिवबंधनात

राज्यात शेतकरी नाराज आहेत. बेरोजगारीमुळे तरुण वर्गातही निराशा आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल, पण अपेक्षित परिणा होणार नाही. मी अनेक पंतप्रधान पाहिले पण नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. पंतप्रधानांचं भाषण देशाला मार्गदर्शक असावं, अशी नाराजी देखील पवारांनी यावेळी व्यक्त केली.

अजित पवारांना सोबत घेणार का?

दरम्यान, निवडणूक निकालानंतर अजित पवार हे भूमिका बदलतील आणि भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे नसून ते एकच आहेत, असेही अधूनमधून लोक बोलत असतात. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीची तयारी, उमेदवारांची निवड, फुटीर आमदारांबद्दलची भूमिका, महाराष्ट्रातले वातावरण अशा विविध विषयांवर ‘बोल भिडू’ला शरद पवार यांनी विशेष मुलाखत दिली.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

ajit pawar pratibha kaki statementsharad Pawar Marathi NewsSharad Pawar On Ajit Pawarsharad pawar press conferenceअजित पवार प्रतिभा काकी वक्तव्यशरद पवार ऑन अजित पवारशरद पवार पत्रकार परिषदशरद पवार मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment