Ajit Pawar : ‘काय नातवाचा पुळका आलाय, मी काय खाताडा-पिताडा आहे का?’; अजित पवारांकडून मनातील खदखद व्यक्त

Vidhansabha Nivadnuk : बारामती विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाकडून त्यांचे नातू युगेंद्र पवार लढत आहेत. आपल्या उमेदवारासाठी आणि नातवासाठी पवार आपली संपूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. अशातच प्रतिभा पवारही प्रचारात सहभागी झाल्याने दादांनी आपली खदखद व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती. मी काय खाताडा-पिताडा आहे का? मी बारामती तालुक्याची वाट लावली का? मी निवडणूक झल्यावर काकींना विचारणार आहे का एवढा पुळका होता, शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. पानसरेवाडी येथे प्रचारवेळी अजित पवार बोलत होते.

घरातील दोन उमेदवार राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही. आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली. तुम्ही लोकसभेला गंमत केली नाहीतर तुमची जम्मत होईल. साहेब म्हणाले मी रिटायर होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे हे तुम्हाला माहित आहे. मी टीका करायला गेलो तर तो आहे माझा पुतण्या. मी टीका करायला गेलो की घरातल्या घरात कसे काढायच? परत असं केलं तर नाभिक समाज नाराज होईल. महिलांना आधी पुरुष मंडळी पैसे द्यायचे आणि हिशेब मागायचे, आता हिशेब द्यायची गरज नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काल महिलांना ५०० रुपये आणून बसवले. त्यांना चहा नाही पाणी नाही ही बारामतीत पद्धत नाही. काम करण्यासाठी नेतृत्वात धमक असावे लागते. लोकसभेला बरेच लोक म्हणायचे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा आता दिवस कमी राहिले आहेत. या गावात सुनेत्रा ला मते ३० टक्के आणि सुप्रियाला ६० टक्के मते होती. यावेळेस चांगल्या पद्धतीने मतदान करावं ही विनंती. पानसरे वाडीतील लोकांना जाऊन नमस्कार करावे म्हणून आलोय. मी ज्यांना पदे दिली तेच माझ्या विरोधात गेले, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

दरम्यान, काही जण सांगतात मागे सुप्रियाला मत दिले आता दादांना देणार असे सांगतात. तुलना करू नाही पण, साहेबांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त काम झाली. असं देखील म्हटलं जातं. बघा साहेबांसोबत तुलना करतो त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Source link

ajit pawarajit pawar baramatiajit pawar baramatuBaramatiSharad Pawarअजित पवारप्रतिभा पवार प्रचारबारामती
Comments (0)
Add Comment