Nilesh Sambare supports Kisan Kathore : लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघातून निलेश सांबरे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला होता
लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघातून निलेश सांबरे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला होता. या निवडणुकीत त्यांनी तब्बल २ लाख ३१ हजार मतं घेतली होती, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा ६६ हजार मतांनी पराभव केला होता.
कथोरेंचा मार्ग सुकर?
सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचा मुरबाड आणि शहापूर भागात मोठा प्रभाव आहे. आता सांबरे यांनी किसन कथोरे यांना थेट पाठिंबा जाहीर केल्यामुळे कथोरेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुभाष पवार आहेत.
मुरबाडमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत जिजाऊ संघटनेने किसन कथोरे यांना विधानसभेसाठी पाठिंबा जाहीर केला. निंबवली गावात प्रचारानिमित्त असलेल्या किसन कथोरे यांची निलेश सांबरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कथोरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Nilesh Sambare : लोकसभेला २ लाख ३१ मतं घेऊनही पराभूत, अपक्षाचा भाजपला पाठिंबा, एका भेटीने सामना पलटला
लोकसभेत सांबरेंना २ लाख ३१ हजार मतं
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे गणित वेगवेगळ्या प्रकारे मांडले जात असले तरी या मतदारसंघात निलेश सांबरेंनी तब्बल २ लाख ३१ हजार मतं मिळवली होती.
कुठून किती मतदान झालेलं?
भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून तब्बल ६२ हजार ८५७ मतं, तर शहापूर विधानसभेत ७४ हजार ६८९ इतकी मतं सांबरे यांना मिळाली होती. शहापुरात सर्वाधिक मते सांबरेंना मिळाली होती. त्याचवेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघात सांबरेंना ६४ हजार ७१३ मतं मिळाली. ही मतं कुणबी समाजाची असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कपिल पाटील यांचे मताधिक्य काही अंशी कमी झाल्याची चर्चा होती