मुंबई पोलिसांकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. तब्बल 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये. चांदीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चाैकशी केली जातंय. आयकर विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 80 कोटी असल्याचे देखील सांगितले जातंय. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशी चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आलीये. पोलिस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जातंय. यावेळी एका ट्रकवर पोलिसांना संशय आला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, अधिकारीही हैराण, तपास सुरू
आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, ही चांदी अवैधरित्या वाहतूक करून निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून याप्रकरणी आता तपास केला जातोय. या चांदीचे काही योग्य कागदपत्रे आहेत की, नाही याची पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. यापूर्वीही मुंबईमध्ये चांदी सापडली होती. ज्याचा तपास सुरू आहे. पळस्पे फाटा चेक नाकावर देखील काही काही दिवसांपूर्वी 3,49, 500 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. निवडणुकीमुळे वाहण्यांची कसून तपासणी केली जातंय.