Onion Price Hike: दरवर्षी सप्टेंबर अखेरीपासून उन्हाळ कांद्याची आवक घटून नोव्हेंबरच्या सुरुवातीस लाल कांद्याच्या आगमनाचे वेध लागतात. यंदा मात्र परतीच्या पावसाचे रुपांतर बेमोसमी पावसात झाल्याने कांद्याचे समीकरण बिघडले.
दरवर्षी सप्टेंबर अखेरीपासून उन्हाळ कांद्याची आवक घटून नोव्हेंबरच्या सुरुवातीस लाल कांद्याच्या आगमनाचे वेध लागतात. यंदा मात्र परतीच्या पावसाचे रुपांतर बेमोसमी पावसात झाल्याने कांद्याचे समीकरण बिघडले. जिल्ह्यात चांदवड, देवळा, नांदगाव, येवला, सिन्नर, बागलाण, मालेगाव या तालुक्यांमध्ये सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्यावर पावसाने पाणी फेरले. देवळा तालुक्यात शेतातील माती वाहून जाण्याचे प्रकार घडले, तर चांदवड-येवला तालुक्यांमध्ये शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला दर प्रतिक्विंटल ५६०० रुपयांवर यंदा वर्षाच्या सुरुवातीस कांद्याचे दर जानेवारी महिन्यात १३५० रुपये प्रतिक्विंटल होते. मे महिन्यात ते २२०० रुपयांवर आले, तर नोव्हेंबरमध्ये बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्यापासून ५६०० रुपये प्रतिक्विंटलवर दर पोहोचले गुरुवारी (दि. १४) पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी ५५०० रुपये दर मिळाला.
मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
किमान ३८००, तर जास्तीत जास्त ६ हजार ९०० रुपयांनी कांदा विकला गेला. लाल कांद्याला सरासरी ३७०० रुपये, किमान २५००, तर जास्तीत जास्त ४७५१ रुपये दर मिळाला कांदा रोपांनाही फटका बेमोसमी पावसाने कांद्यासोबतच टोमॅटो, सोयाबीन, मका आदी पिकांनाही मोठा फटका बसला. कांद्यासोबतच उन्हाळ कांद्याच्या रोपांवरूनही पाणी फेरले गेले. सुमारे साडेसहाशे हेक्टर क्षेत्रावरील कांदा रोपवाटीकेचे नुकसान झाल्याच्या नोंदी होत्या. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी पुन्हा बियाण्यांची खरेदी चढ्या दराने करावी लागत आहे. अवेळी पावसाच्या फटक्यामुळे कांद्याची रोपे धोक्यात आली। होती. त्यामुळे आगामी कांदा लागवडीसाठी आवश्यक कांदा रोपे दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट भावाने घ्यावी लागत आहेत. या रोपांचा खर्च प्रतिएकर सुमारे २० ते २४ हजार रुपये आहे.
नाशिकचा कांदा दिल्लीत
दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभरीपार जात आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकहित लक्षात घेऊन सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिकहून सुमारे १३०० मेट्रिक टन कांदा दिल्लीत पाठविण्यात आला. परिणामी, तेथील स्थानिक बाजारात काही दिवसांत कांद्याच्या किमती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.
लक्षवेधी
■ दिवाळीमध्ये बाजार समित्यांना सुट्या
■ उन्हाळ्यामध्ये कांदा उत्पादनात घट
■ उन्हाळ कांद्याचा हंगाम संपला
■ संपलेला हंगाम व बिगरमोसमी पावसाचा १३ हजार हेक्टरवरील कांद्याला फटका
गेल्यावेळी सुमारे एकरभर क्षेत्रातून सरासरी १०० क्विंटलचे कांदा उत्पादन आम्ही घेतले होते. यंदा पावसाच्या फटक्याने दोन एकर क्षेत्रातून अवघे २० ते २५ क्विंटल उत्पादन कसेबसे निघाले. उत्पादन घटल्याने भाव मिळूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्या नुकसानीतील पंचनामेही व्यवस्थित झालेले नाहीत. – महेंद्र सूर्यवंशी, शेतकरी
कांद्यासह कोणत्याही कृषीमाल उत्पादनात शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक ती बियाणे, शेतीसाठी उपयुक्त अवजारे आणि खतांवरील जीएसटी रद्द करून दिलासा द्यायला हवा. – बाळकृष्ण सानप, शेतकरी
गतवर्षी उन्हाळ्यात कांद्याचे चांगले पीक आले असताना केंद्राने निर्यातबंदी केल्यामुळे त्याचा फटका बसला. यंदा पीक हातातोंडाशी असताना बेमोसमी पावसाने दगा दिल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले. – एकनाथ गवळी, शेतकरी
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा