भाजपकडून पगार घेऊन यांना पोटाची भूक भागवायचीय, मुलांचं शिक्षण करायचंय; राहुल गांधींची जहरी टीका

Rahul Gandhi Remarks on Journalists at Amravati: पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स

अमरावती : ‘पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. पोटाची भूक भागवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्याने मालकाचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत’, अशी जहरी टीका संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकारांवर केली आहे. त्यांच्या या सततच्या टीकेवरून पत्रकारांमध्ये संताप वाढू लागला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी मीडियालच लक्ष्य केले. ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार, लोकसभेत हे करून दाखविणार असे सांगत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. हे सर्व मीडियावले दाखवित नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात.
तुम्ही महाराष्ट्रातील सरकार पैशांच्या जोरावर चोरले; प्रियांका गांधींचा कोल्हापुरातून थेट PM मोदींवर हल्ला
राहुल गांधी पुढे म्हणाले, हे तुम्हा लोकांचे नाहीच असेही सांगतात. त्यांची चूक नाही. हे मला आवडतात. पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत. त्यामुळे यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काहीही दाखविणार नाही. २४ तास मोदी दाखविणार. मी म्हणालेले काहीही दाखविणार नाही.उलट सायंकाळी मोदी यांची मेमरी खूप मस्त आहे. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ७० वर्षे विसरत नाहीत. त्यात पुन्हा जोडतील. लहान असताना मोदी तलावात मगरीशी लढले होते. मगरीला त्यांनी बुडविले. पण, जेव्हा हेच मोदी गंगा नदीवर जातात तेव्हा त्यांना पोहता येत असल्याचे जाणवत नाही, अशी टीकाही त्यांनी केली, अशी टीकाही केली.

पत्रकारांकडून तीव्र शब्दांत निषेध

‘आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात. आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे. आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे. पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणे देणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नाही.’ अशा शब्दांत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो…. आणखी वाचा

Source link

Amravati jornalistsamravati vidhan sabhaMaharashtra vidhan sabha nivadnukRahul GandhiRahul Gandhi remark on journalistsअमरावती पत्रकार संघटनाराहुल गांधींची अमरावती सभाराहुल गांधींचे भाषणविधानसभा निवडणुकीच्या घडामोडी
Comments (0)
Add Comment