तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा

Beed Murder News : बीड शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी करत हत्येचा ४८ तासात छडा लावला आहे. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक जाधव, बीड : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मोंढा रोडने नदीच्या कडेला तांदळवाडी हवेली येथील तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख सुद्धा पटत नव्हती, परंतु बीड शहर पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून मृताची ओळख तर पटवली. इतकंच नाही तर पोलिसांनी या हत्येतील सर्व चारही मारेकऱ्यांना ४८ तासाच्या आत अटक केली आहे. यातील मुख्य दोन आरोपी हे हत्येनंतर पुणे येथे फरार झाले होते. माहितीच्या आधारे इतर दोन आरोपींना पुणे येथून अटक करण्यास बीड शहर पोलिसांना यश आले आहे.
Jhansi Hospital Fire : भीषण आगीतून ५ बाळांना वाचवलं, पण माझं बाळ अजून मिळालं नाही… हतबल वडिलांनी सांगितली सुन्न करणारी घटना
आता आरोपींना अटक झाल्यानंतर हत्या कशी आणि का करण्यात आली याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी हत्या झाली ते ठिकाण निर्जन ठिकाण आहे. त्या ठिकाणी यातील महिला आरोपी अनिता नरसिंह आदमाने (रा. माळीवेस बीड) तिने तात्पुरते राहण्याची निवास व्यवस्था केली आहे. त्या महिलेकडे सैयद मजहर याचे जाणे येणे असायचे. परंतु तिच्याकडे इतर कोणी आलेले त्याला आवडायचे नाही. पुणे इथून अटक केलेले आरोपी रामू बंडू चित्रे (रा. यादवाचा मळा माळीवेस) आणि गणेश वसंत माने (रा. माळीवेस चौक) हे दोघे यांचे तेथे येणे जाणे वाढले होते.
सॉफ्टवेअर इंजिनिअरने एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवलं, पोलीस तपासात हत्याकांडबाबत धक्कादायक माहिती उघड
घटनेच्या दिवशी रामू आणि गणेश हे दोघेजण तेथे दारू पीत बसले होते. खरं तर एका गुन्ह्यामुळे रामूच्या मागावर पेठ बीडची पोलीस होती, म्हणून तो तिथे लपण्यासाठी आला होता. परंतु यातील मृत सय्यद मजहर हा रात्री बारा वाजताच्या सुमारास तेथे येऊन रामू आणि गणेशला काठीने मारहाण करू लागला. त्यामुळे तिथून ते निघून जाऊ लागले. ते नदीच्या कडेने जात असता सय्यदने परत पाठीमागून रामूला आणि गणेशला दगड मारायला सुरुवात केली. तो ऐकत नाही हे पाहून रामू आणि गणेश यांनी दोघांनी त्याला दगडाने ठेचून आणि काठीचे घाव डोक्यात घालून जागीच ठार केले.

Crime News : तरुणाची निर्घृण हत्या, चेहऱ्यावरुन ओळख पटेना तरी पोलिसांनी ४८ तासात असा लावला छडा

दुसऱ्या दिवशी सकाळी यातील सर्व आरोपी चार ठिकाणी जाऊन बसले. आपल्याला काहीच माहिती नाही असा बनाव त्यांनी केला. परंतु पोलिसांनी सर्व प्रकरणाची माहिती समोर आणली आणि आरोपींना ४८ तासाच्या आत अटक केली. पुणे येथून रामू आणि बंडू याला अटक करण्यासाठी डीबी पथकाने मेहनत केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, बाबा राठोड, उमेश निकम, रियाज शेख, पोलीस अंमलदार सुशेन पवार, विकी सुरवसे, आयटीसीएल पोलीस नाईक जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद आणि मनोज परजने यांनी केली आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Beedbeed crime newsBeed policebeed police solve murder mysterybeed youth murderबीड क्राईम बातमीबीड तरुणाची हत्याबीड तरुणाची हत्या आरोपी ताब्यात
Comments (0)
Add Comment