Numerology Prediction, 17 November 2024 : 17 नोव्हेंबर, रविवार, मूलांक 1 साठी व्यवसायात प्रगतीसह उत्तम नफा आहे. मूलांक 2 असणाऱ्यांनी महत्त्वाची कामे आधी पूर्ण करा. मूलांक 4 चे जातक दिवसभर व्यस्त राहणार आहात त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मूलांक 6 च्या लोकांना कामे पूर्ण करताना अडथळ्यांचा सामना करावा लागेल. मूलांक 8 असणाऱ्यांनी कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मूलांक 9 साठी कामात कठोर मेहनत आणि संघर्ष आहे. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – व्यवसायात प्रगतीसह उत्तम नफा
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्तम असून व्यवसायात प्रगती आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण असून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबात वातावरण ठिक असेल.
मूलांक 2 – महत्त्वाची कामे आधी पूर्ण करा
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसभर तुम्ही कामात व्यस्त राहणार आहात. जी काही महत्त्वाची कामे आहेत त्याकडे आधी लक्ष द्या आणि पूर्ण करा. घरात वातावरण ठिक असेल.
मूलांक 3 – मनात विचारांचा गोंधळ, कामात दुर्लक्ष होईल
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, तुम्हाला कामाचा ताण येवू शकतो. मनात विचारांचा अधिक गोंधळ असेल त्यामुळे तुम्ही विचलीत राहाल. कामात फार लक्ष लागणार नाही. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत थोडा जास्त वेळ व्यतीत करा तुम्हाला लाभ होईल.
मूलांक 4 – दिवसभर व्यस्त, तब्येतीची काळजी घ्या
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे पण काही महत्त्वाच्या कामांमुळे तुम्ही अधिक व्यस्त राहणार आहात. तब्येतीची काळजी घ्या आणि जंक फूड खाणे बंद करा. डॉक्टर काही तपासण्या सांगतील तर त्वरीत करून घ्या. घरात वातावरण ठिक आहे. तुम्ही आज चिडचिड जास्त कराल त्यात कंट्रोल ठेवा
मूलांक 5 – स्वतःसाठी वेळ काढा, ताणतणाव कमी होईल
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे पण आज कोणाला तरी भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही या भेटीची खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. दिवसभर कामात व्यस्त असताना स्वतःसाठी वेळ काढा. प्रवासाचा योग आहे आणि त्यात लाभ होईल. घरात वातावरण ठिक आहे.
मूलांक 6 – कामे पूर्ण करताना अडथळ्यांचा सामना
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. आज अनेक योजना तुम्ही तयार करणार आहात. तुम्हाला त्याप्रमाणे काम करायचे आहे पण अनेकजण त्यात हस्तक्षेप करतील. तुम्ही जे काही ठरवलं आहे ते करताना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 7 – ताणतणाव वाढेल, सकारात्मक विचार करा
मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागणार आहे. घरची मंडळी तुमचा त्रास वाढविण्याची शक्यता आहे. तुमची चिडचिड वाढेल. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार करा.
मूलांक 8 – कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
मूलांक 8 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, तुमची अपूर्ण काम वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाहीत. मौजमस्ती करणे ठिक आहे पण त्याला पण काही प्रमाण असते. जितके शक्य होईल तुमच्या कामावर फोकस करा. एखादी मिटींग असेल तर त्यात तुम्हाला उशिर होईल तेव्हा वेळेत सगळी कामे होतील असे पाहा.
मूलांक 9 – कामे करताना संघर्ष आणि मेहनत
मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे पण कामे पूर्ण करताना संघर्ष आणि मेहनतकरावी लागेल तरच तुमचे काम पूर्ण होणार आहे. एखादे काम पूर्ण करताना इतरांची मदत घ्यावी लागेल, तर ती मदत घ्या आणि कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण ठिक असेल.