P Chidambaram left Mumbai Congress Manifesto : काँग्रेस मार्फत आज सकाळी 11 वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं होतं.
काँग्रेस मार्फत आज सकाळी 11 वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. माध्यम विभागाने दिलेल्या मेसेजनुसार या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचा मुंबई करीता असलेलं जाहीरनामा प्रकाशन करण्यात येणार असं सांगण्यात आलेलं होतं. पी चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेवेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड सुद्धा उपस्थित होत्या. पी चिदंबरम यांची पत्रकार परिषद संपताच वर्षा गायकवाड यांनी त्यांना मुंबईचा जाहीरनामा प्रकाशन करण्याचा आग्रह केला, मात्र पी चिदंबरम यांनी त्यास नकार देऊन पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
Mumbai Congress Manifesto : चिदंबरम आले, पण मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित न करताच निघाले, वर्षा गायकवाडांकडून मनधरणी, मात्र…
आग्रह करूनही प्रकाशनास नकार देण्याचं कारण मात्र समजू शकले नाही. तदनंतर वर्षा गायकवाड यांनी मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित केला. महाविकास आघाडी मार्फत कुठलाही मोठा नेता यावेळी उपस्थित नव्हता. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा उपस्थित होते. मुंबईचा जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश शेट्टी सुद्धा यावेळी उपस्थित होते. मात्र मुंबईचा जाहीरनामा प्रकाशनाला ऐनवेळी पी. चिदंबरम यांनी नकार देण्याचीच चर्चा जास्त होती..