Bandra East Vidhan Sabha Nivadnuk Poll Results : मातोश्रीच्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कुणाला कौल?
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनेलवरुन पोल घेण्यात आला. यातून युजर्सचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २४ तासांच्या कालावधीत एक लाख ५० हजारांहून अधिक ऑनलाईन मतदारांनी आपली पसंती दर्शवली आहे. यातील आकडेवारीनुसार तब्बल ७६ टक्के युजर्सनी आपली पसंती वरुण सरदेसाई यांना दिली आहेत.
त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उतरलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांना अवघी १५ टक्के मतं मिळाली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांमध्ये थोडा-थोडका नव्हे, तर तब्बल ६० टक्के मतांचा फरक आहे. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर तृ्प्ती सावंत असून त्यांना फक्त ९ टक्के युजर्सनी पसंती दर्शवली आहे.
Bandra East Online Poll : मातोश्रीच्या अंगणात कोण मारणार सिक्स? तिहेरी लढतीत ७६ टक्के युजर म्हणतात, आमचा आमदार फिक्स
कुणाला किती मतं?
आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं, तर प्रथम क्रमांकावरील वरुण सरदेसाई यांना १ लाख १५ हजारांच्या आसपास युजर्सनी (७६ टक्के) मतदान केले आहे. दुसऱ्या स्थानावरील आमदार झिशान सिद्दीकी यांच्या पाठीशी जेमतेम २२ हजारांच्या जवळपास (१५ टक्के) ऑनलाईन मतदार आहेत. तर तिसऱ्या नंबरवरील मनसेच्या तृप्ती सावंत यांना साधारण १३ हजारांच्या घरात (९ टक्के) मतं पडली आहेत.
प्रत्यक्ष मतदानात जनता कोणाच्या पाठीशी उभी राहणार हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. कारण ऑनलाईन मतदान असल्यामुळे यात मतदारसंघाबाहेरील युजर्सनीही आपली मतं नोंदवलेली आहेत. त्यामुळे हे आकडे प्रत्यक्ष मतदानाचे निदर्शक नसून ही आकडेवारी फसवीही ठरु शकते.