Supriya Sule : ‘पुरावा आलाय, आता कोर्टात जाणार’; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. पवारसाहेबांचा फोटो वापरण्यास मनाई असतानाही अजित पवार गटाने तो वापरल्याचा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुळे यांनी जुन्नरचे महायुतीचे उमेदवार अनुल बेनके यांनाही टीका करत एकाच वेळी दोन्ही दगडांवर हात ठेवू नका, असा सल्ला दिला.

महाराष्ट्र टाइम्स

पुणे : ‘ज्यांनी तुमच्या, माझ्या आणि आपल्या पवारसाहेबांचा पक्ष आणि चिन्ह नेले, त्यांच्या विरोधात ही लढाई आहे. न्यायालयाने चार दिवसांपूर्वी त्यांना सांगितले आहे, की स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही. तरीही त्यांनी साहेबांचा फोटो वापरल्याचा पुरावा माझ्याकडे आला आहे. आता तो मी कोर्टात नेणार आहे,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सुनावले. त्याच वेळी त्यांनी जुन्नरचे महायुतीचे उमेदवार अनुल बेनके यांना लक्ष करताना तुझा जो नेता आहे ना त्याचा फोटो लाव, माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, कुठे तरी निष्ठा ठेव. दोन्ही दगडांवर हात ठेवशील तर पडशील अशा शब्दात टीका केली. जुन्नरचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारानिमित्त राजुरी येथे आयोजित सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

‘भरीव निधी आणू’

“जीएमआरटी’ खोडद दुर्बीण प्रकल्पामुळे येथे खासगी प्रकल्प उभारणी, औद्योगिक वसाहती उभारण्यावर निबंध आले. त्यामुळे शेती आणि शेतीपुरक व्यवसायांसाठी सरकारकडून भरीव निधी आणून मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शेरकर यांनी सांगितले.

‘प्रेमाणे मागितले असते, तर पक्षच काय चिन्ह पण दिले असते. जन्मापासून मी सत्ता पाहिली आहे. प्रेमाणे मागितल्यास माझा प्रॉब्लेम नव्हता. पण आता मात्र तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले. शरद पवार व उद्धव ठाकरेंचे पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. कै. निवृत्तीशेठ शेरकर यांनी गावोगावी सायकलवर प्रवास करून सभासद गोळा करून कारखाना उभारला आहे. शिवसैनिक नेहमी आदेश पाळतो. गद्दारी कधीच करीत नाही,’ असे खंडागळे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हाचा वाद अजूनही कोर्टात आहे. बुधवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरू नका असे तोंडी आदेश दिले. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं, असं अजित पवार गटाला कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

ajit pawarjunnarPune newsSupriya Suleअजित पवारजुन्नरसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment