Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघाची बांधणी करत जनसंपर्क साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी ११ वाजता उमरेडमध्ये सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघाची बांधणी करत जनसंपर्क साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी ११ वाजता उमरेडमध्ये सभा होणार आहे. ते लगेच कोल्हापूरला रवाना होतील. ते दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा, गोंदियात सभा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दुपारी पावणेबारा वाजता गडचिरोली तर, १२.३५ वाजता वर्धा येथे सभा आहे. यानंतर त्यांची काटोल येथे चरणसिंग ठाकूर आणि नंतर सावनेर येथे डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत. सायंकाळी ते मुंबईला रवाना होतील. शहा यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार असून मतदारसंघातही ते संवाद साधणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत सभा आहेत.
प्रियांका गांधी यांचे येथे विशेष विमानाने आगमन होताच लगेच हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे जाहीर सभेसाठी रवाना होतील. दुपारी १२.१५ ते १.१५ वाजेपर्यंत एक तास त्या सभेस उपस्थित राहतील. यानंतर हेलिकॉप्टरने नागपूरला आमगन होईल. लगेच त्यांचा रोड शो होणार आहे. प्रियांका गांधी यांची सव्वादोन तासांत तीन रोड शो आहेत. २ वाजून ५ मिनिटांनी विमानतळापासून रोड शो प्रारंभ होईल. यानंतर २.३० वाजता दुसरा सुरू होईल. हा रोड शो तब्बल सव्वा तासाचा आहे. ३.५० वाजता तिसरा टप्पा आहे. अर्धा तास म्हणजे ४.२० वाजेपर्यंत चालेल. पश्चिम नागपुरात अहबाब कॉलनी, चोपडे लॉन, जाफरनगर, दिनशॉ फॅक्टरी मार्गे बोरगाव चौकात समारोप होणार आहे.
मध्य नागपुरात बंटी शेळके यांच्यासाठी गांधी गेट येथून रोड ड शो प्रारंभ होईल. प्रियांका गांधी ४.३० वाजता दिल्लीला रवाना होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली आहे. त्यांना मतदारसंघ सांभाळून राज्याच्या अन्य भागातही दौरा करावयचा असल्याने ते दुपारी रवाना होतील. देवेंद्र फडणवीस यांची प्रचार यात्रा सकाळी ८ वाजता जयताळा येथून प्रारंभ होईल. सहकारनगर सोनेगाव मार्गे उज्ज्वलनगर येथे समारोप होईल. यानंतर त्यांच्या चांदवड व नाशिक शहरात सभा होणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा सायंकाळी ७ राजस्थानी मेळावा होणार आहे. रात्री ८ वाजता पश्चिम नागपुरात जाहीर सभा होणार आहे. अभिनेते विवेक ओबेराय यांचा प्रवीण दटके यांच्यासाठी मध्य नागपुरात रोड शो होणार आहे. अभिनेत्री खासदार कंगना रनौट यांचा पश्चिमचे सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ दुपारी १ वाजता लॉ कॉलेज चौकातून रोड शो प्रारंभ होईल. बजाजनगर चौकात समारोप होणार आहे, अशी माहिती पश्चिमचे प्रभारी संदीप जोशी यांनी दिली.
शनिवारही गाजला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, खासदार रणदीप सुरजेवाला, सरचिटणीस अविनाश पांडे, आपचे खासदार संजय सिंग, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेत्यांनी शनिवार गाजवला.