Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरूद्ध बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षाकरता निलंबन केलं आहे, असं उपाध्यक्ष व प्रशासन संघटन नाना गावंडे यांनी पत्राद्वारे कळवलं आहे. बातमी वाचा सविस्तर…
३. ‘महाराष्ट्रात आरक्षणाला जे जे आडवे आले, त्यांचा सुपडासाफ करा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीही असो त्याला पाडा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीच सत्तेत राहायला नको, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. आता कस तुमचा आहे,’ असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवला तालुका दौऱ्यात केले.
४. शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली होती. एकंदिरत निवडणुकीआधी आणि नंतर राज्यात अनेक पक्ष एकत्र आले आणि गेले पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? याची वाट महाराष्ट्राची जनता पाहत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये मनसेसोबत युती का नाही या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.
५. नुकताच एक अत्यंत हैराण करणारी घटना पुढे आलीये. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केलाय. एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आलाय. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. ही घटना उत्तर प्रदेशातील हापूरमधील आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
६. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत आहे. मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्या जुन्या सवयीनुसार जबरदस्तीची वक्तव्ये करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीसाठी खास योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात रंजक लढत पाहायला मिळू शकते.
७. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर लवकरच यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगत आहे. सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अजिबातच भाष्य करताना ऐश्वर्या किंवा अभिषेक दिसले नाहीत. ऐश्वर्याने जलसा बंगला सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले. अनंत अंबानीच्या लग्नामध्येही ऐश्वर्या मुलगी आराध्या हिच्यासोबतच पोहोचली होती. दुसरीकडे संपूर्ण बच्चन कुटुंबिय एकत्र आले होते.
८. बॉलिवूड अभिनेता गोविंदाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी, १६ नोव्हेंबर रोजी त्याची प्रकृती अचानक खालावली, त्यामुळे तो महाराष्ट्रात सुरू असलेला निवडणूक प्रचाराचा रोड शो सोडून मुंबईत परतला. त्याला अचानक छातीत दुखू लागल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारासाठी गोविंदा जळगावात गेला होता. तेथे चार ठिकाणी प्रचार करून त्याला मुंबईत परतावे लागले. त्यामुळे गोविंदाला त्याचा रोड शो मध्यातच थांबवावा लागला.
९. राठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची लोकप्रियता देशभरात आहे. त्यांनी मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि गुजराती भाषांमध्ये काम केले. मराठी आणि गुजराती रंगभूमीवरील त्यांचे काम प्रेक्षकांच्या कायम पसंतीस उतरले. याशिवाय रोहिणी यांनी मालिकाविश्वातही काही गाजलेल्या भूमिका केल्या. चार दिवस सासूचे मधील ‘आशालता देशमुख’ असो किंवा ‘होणार सून मी ह्या घरची’मधील आई आजी असतो, प्रेक्षकांनी या पात्रांवर अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे मनापासून प्रेम केले. मात्र अलीकडेच एका मुलाखतीमध्ये बोलताना रोहिणी म्हणाल्या की, टेलिव्हिजनमध्ये आता अनुकूल परिस्थिती नसल्याने त्यांना मालिका करावीशी वाटत नाही.
१०. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता अंतिम टप्यात आला असून महायुती आणि महाविकास आघाडीने आता आपले सर्वच नेते मंडळींना प्रचाराच्या मैदानात उतरविले आहे. परिणामी प्रचाराच्या अखेरच्या दोन दिवसांत अनेक केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज नेत्यांची जंत्री राज्यात पहायला मिळणार आहेत. यात प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…