Amravati Navneet Rana Attack: दर्यापूर मतदारसंघ हा महायुतीच्या शिंदे गटाला सुटला आहे. यामध्ये शिंदे गटाचे कॅप्टन अभिजीत अडसूळ उमेदवार आहेत. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातून माजी आमदार आणि भाजपचे निष्ठावंत रमेश बुंदेले यांच्यात लढत सुरू आहे.
हायलाइट्स:
नवनीत राणांवर अमरावतीत हल्ला
अश्लील हातवारे आणि शिव्या
दोन गट आपसात भिडले
जयंत सोनोने, अमरावती : अमरावती जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगले तापले आहे. काल दर्यापूर मतदारसंघातील खल्लार येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची प्रचार सभा सुरू असताना त्यांच्यावर अश्लील हातवारे करण्यात आले. त्यामुळे उपस्थित विशिष्ट समुदायातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. यामुळे खल्लार येथे काही काळ तणावाची परिस्थिती होती. दर्यापूर मतदारसंघ हा महायुतीच्या शिंदे गटाला सुटला आहे. यामध्ये शिंदे गटाचे कॅप्टन अभिजीत अडसूळ उमेदवार आहेत. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातून माजी आमदार आणि भाजपचे निष्ठावंत रमेश बुंदेले यांच्यात लढत सुरू आहे. महायुतीमध्ये दोन गट असल्याने काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. त्यामध्ये भाषण सुरू असताना काही असामाजिक तत्त्वांनी अश्लील हातवारे करत नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रकरण सुरू असताना काहीच काळात भारतीय जनता पक्ष आणि युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या लक्षात हे प्रकरण येताच त्यांनी अश्लील हातवारे करणाऱ्यांना रोखले त्यानंतर या ठिकाणी मोठा राडा झाला.
Today Top 10 Headlines in Marathi: घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची उधळण, पुण्यात माजी उपसरपंचाची अपहरण करुन हत्या; सकाळच्या दहा हेडलाईन्स
यावेळी नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलीस स्टेशन येथे जात आपले लेखी तक्रार दिली. दर्यापूर आणि खल्लार या गावात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
यासंदर्भात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, ”खल्लारमध्ये आमची सभा सुरू होती. आम्ही शांततेत प्रचार करत होतो. माझं भाषण सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. माझ्या दिशेने बघून घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकल्या. भाषण झाल्यानंतर मी स्वत: त्यांच्याकडे समजावण्यासाठी गेली. मात्र, त्या लोकांनी माझ्यावरही खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला”.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा