Weekly Career Horoscope, 18 to 24 November 2024: नोव्हेंबर महिन्याचा हा तिसरा आठवडा आहे. या आठवड्यात बुधादित्य राजयोग असून वृषभ, मिथुन सह या 5 राशींना करिअरमध्ये यश असून धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. व्यवसायाच नवीन डिल होईल आणि प्रोजेक्टवर तुमचा पूर्ण ताबा असेल. तुमची कामे यशाच्या मार्गाने जाणार आहेत. चला तर सविस्तरपणे जाणून घेवूया मेष ते मीन पर्यंत आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल, चला पाहूया या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य.
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण, ऑफिसमध्ये कौतूक
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून तुमची ऑफिसच्या कामात प्रगती होणार आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील आणि ऑफिसमध्ये तुमचे कौतूक होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा असून गुंतवणुकीबाबत मनात शंका असेल. तब्येतीत सुधारणा असून प्रियजन आणि घरातील सदस्य तुमची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून अथक प्रयत्न करतील. प्रवासामुळे त्रासाची शक्यता आहे म्हणून प्रवास टाळावा. लवलाइफ ठिक आहे पण तुमच्यात थोडा नाराजीचा सूर असेल. आठवड्याच्या शेवटी एखादी बातमी तुम्हाला दुःखी करू शकते.
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती सुधारेल, धनलाभाचे योग
हा आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम असून आर्थिक स्थिती सुधारेल आणि धनलाभाचे संकेत आहेत. कामाच्या बाबतीत मेहनत आहे आणि काही कारणाने मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. लवलाइफ ठिक पण एसएमएस किंवा मेसेज पाठवताना तो आधी नीट वाचा अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या बाबतीत रणनीती आखा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. तब्येत सांभाळा कारण पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. प्रवासात यश आहे. आठवड्याच्या शेवटी जीवनात सुखसमृद्धीचे योग आहेत.
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : सुख समृद्धीचे योग, निर्णय लाभदायक
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या प्रत्येक कामात कुटुंबाची साथ मिळेल. जीवनात सुख समृद्धीचे योग असून आर्थिक स्थितीत सुधारणा आहे. ऑफिस किंवा व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय शुभ परिणाम देतील. लवलाइफ चांगली आहे. योगासन आणि ध्यान यामुळे आरोग्याच्या बाबतीत उत्तम सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटी महिलेमुळे तुमचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आळस सोडा, कामाला लागा
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असून प्रवासाचा योग आहे. प्रवासात लाभ होईल त्यामुळे प्रवास करा. लवलाइफ चांगले आहे, प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत सुधारणा हवी असेल तर कामात आळस नको. फोकस ठेवा आणि मेहनतीने पुढे जा. तब्येतीकडे लक्ष द्या. घरात तुम्हाला हवे असणारे बदल त्वरित होणार नाहीत म्हणून तुम्ही निराश होवू नका. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल होतील.
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : मेहनतीचे फळ मिळेल
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून कुटुंबातील एखादी महिला तुम्हाला आर्थिक बाबतीत मदत करेल. तुम्हाला सुखद अनुभव मिळेल. लवलाइफ ठिक आहे पण एकमेकांना समजून घ्या. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहे त्यामुळे गुंतवणुकीबाबत चिंता वाढू शकते. मेहनतीचे फळ मिळेल त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. प्रवासात फारसा लाभ नाही त्यामुळे तो पुढे ढकलावा. आठवड्याच्या शेवटी, घराच्या सजावटी संदर्भात काही खरेदी कराल.
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नवीन गुंतवणुकीतून लाभ
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत. नवीन गुंतवणुकीमुळे चांगले परिणाम मिळतील. लवलाइफ ठिक आहे फक्त एकमेकांना नीट समजून घ्या. ऑफिसच्या कामात थोडा त्रास आहे तसेच काही बातम्या तुमचे मन दुखवू शकतात. कुटुंबात सुख समाधान नांदावे म्हणून तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडू शकते, तेव्हा काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचा योग आहे पण तो टाळणे उत्तम आहे.
तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक सुधारणा, गुंतवणुकितून लाभ
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात प्रगती असून नवीन प्रोजेक्ट शुभ परिणाम देतील. आर्थिक स्थिती सुधारणा असून गुंतवणुकीतून फायदे होतील. कुटुंबात वातावरण हसते खेळते असेल. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला ऐका तुमची कामे पटापट मार्गी लागतील. तब्येतीची काळजी घ्या आणि जंक फूड खाणे टाळा. प्रवासात शुभयोग आहेत त्यामुळे प्रवास करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही शांतपणे वेळ व्यतीत करणार आहात.
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्ट यशाच्या मार्गावर
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्ट यशाच्या मार्गावर आहेत. तुम्ही प्रोजेक्टचे काम पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात ठेवाल. तब्येतीत सुधारणा आहे तसेच घरातील समाधानी वातावरणामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळणार आहे. लवलाइफमध्ये थोडे वाद होतील पण संवाद साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी जबाबदारी वाढणार आहे.
धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात प्रगती, करिअरमध्ये यश
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती घेवून येतो आहे. तुम्ही करिअरमध्ये एक नवीन टप्पा गाठणार आहात. लवलाइफ ठिक असून प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. नोकरीमध्ये रिलोकेशचा विचार करत आहात आणि जोडीदाराची याला साथ मिळेल. तब्येतीत सुधारणा आहे. प्रवास टाळा, अन्यथा कष्ट होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी ताण तणाव वाढण्याची शक्यता असून झोपेवर परिणाम होवू शकतो.
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्टसंबंधी चांगली बातमी मिळेल
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्हाला प्रोजेक्टसंबंधी चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. लवलाईफ ठिक आहे. तुम्ही जास्त खरेदी करणार आहात. तुम्हाला प्रियजनांकडून धोका होऊ शकतो किंवा तुम्ही फसवले जावू शकता. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा खूप महागात पडेल, वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासात यश आहे त्यामुळे प्रवास करा. तुम्हाला जे काही बदल अपेक्षीत आहेत ते लगेच होणार नाहीत त्याला थोडा वेळ द्या, याची जाणीव आठवड्याच्या शेवटी होईल.
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थितीत सुधारणा, मेहनत जास्त असणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठिक असून तब्येतीत उत्तम सुधारणा होणार आहे. तुम्ही जीवनशैलीत केलेला बदल चांगले परिणाम देणार आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात मेहनत जास्त आहे आणि एखाद्या महिलेमुळे तुमचे टेन्शन थोडे वाढू शकते. या आठवड्यात प्रवास करताना भावनिक ताण येवू शकतो, त्यामुळे प्रवास टाळावा. लवलाइफमध्ये सुसंवाद साधा, अन्यथा समस्या होऊ शकतात. कुटुंबात काही कारणाने अडचणी येवू शकतात. आठवड्याच्या शेवटी सुखद बातमी मिळेल.
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात प्रगती, निर्णय पटापट घ्या
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा म्हणजे कार्यक्षेत्रात प्रगती असून ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे जीवनात नवीन मार्ग दिसतील. निर्णय पटापट घ्या म्हणजे कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत धनलाभाचा योग असून गुंतवणूक करू शकता. प्रवासात यश मिळेल त्यामुळे प्रवास करावा. तब्येतीकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी घरात काही मंगलकार्यासंदर्भात चर्चा होईल.