नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह बोगदा; कसा असेल मार्ग? टोलसाठी भरावे लागणार पैसे

Orange Gate Marine Drive Tunnel : अटल सेतू आणि ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह या टनल मार्गावर टोल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतून मरिन ड्राईव्ह पोहोचणाऱ्या वाहन चालकांना यामुळे अधिक टोल भरावा लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह टनलमार्गे मरिन ड्राइव्ह पोहोचणाऱ्यांसाठी प्रवास महागणार आहे. नव्या माहितीनुसार प्रशासनाने ९.२३ किमी लांबीच्या ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह प्रॉजेक्ट मार्गावर टोल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा टोल २२ किमी लांबीच्या अटल सेतूद्वारे ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह टनलमधून प्रवेश करणाऱ्या वाहनांना लागू होणार आहे.

दुसरीकडे चेंबूर मार्गावरुन इस्टर्न फ्रीवे या मार्गावरुन मरीन ड्राईव्हकडे येणाऱ्या वाहनांना टनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टोल भरावा लागणार नाही. अटल सेतू आणि इस्टर्न फ्रीवेवरून येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांसाठी टनलमध्ये स्वतंत्र मार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती आहे.

सध्या नवी मुंबईहून अटल सेतू या मार्गे मुंबईत येणाऱ्या कार चालकांना २५० रुपये टोल द्यावा लागतो. आता ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह टनलवरही टोल आकारण्यात आल्याने वाहनचालकांचा खर्च वाढणार आहे.
नरिमन पॉईंट ते विरार दीड तासांचा प्रवास ३५ मिनिटांत होणार, कसा असेल मार्ग? कधी सुरू होणार?

डिसेंबरपर्यंत काम सुरू होणार

अटल सेतू नंतर, ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह प्रकल्प हा एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाचं काम सुरू करण्यापूर्वी भू-तांत्रिक तपासणीचं काम पूर्ण झाले आहे. ९.२३ किमी लांबीचा मार्ग तयार करण्यासाठी एमएमआरडीएने ३५ ठिकाणी मातीची चाचणी केली आहे. या वेळी जमिनीच्या पृष्ठभागापासून किती खाली खडक आहे, पाण्याची पातळी काय आहे, माती कशी आहे, पाया उभारण्यासाठी किती खोल खोदावं लागेल अशा सर्व गोष्टींचा अहवाल तयार करण्यात आला आहे. भू-तांत्रिक तपासणी अहवालानुसार, प्रकल्पाचं काम वर्षअखेरीस डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास होणार महागडा, कुठून-कुठपर्यंत किती असणार भाडं? कसा आहे मार्ग?

काय आहे नेमका प्रोजेक्ट?

दक्षिण मुंबईतून वाहनांना उपनगरांमध्ये सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करण्यासाठी ९.२३ किमी लांबीचा कॉरिडोर बनवण्याची योजना आहे. यासाठी ६.२३ किमीचा अंडरग्राऊंड मार्ग तयार केला जाईल. या प्रोजेक्टद्वारे ईस्टर्न फ्री-वे कोस्टल रोडला थेट कनेक्ट केला जाईल. हा कॉरिडोर पी डिमेलो रोडवरील ऑरेंज गेटवरुन मरिन ड्राइव्हजवळ बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडपर्यंत असेल. या कॉरिडोरसाठी ७७६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. वाहनांसाठी या टनलमध्ये २-२ अशा लेन असतील.
गोरेगाव – मुलुंड लिंक रोडमुळे वेळ वाचणार, कसा, कुठून असेल टनलचा मार्ग? कधीपर्यंत सुरू होणार?

टोल आकारण्याचा निर्णय का?

MMRDA ला प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर कर्जाची रक्कम परत करण्याची गरज असते. पैशांची सोय करण्यासाठी एमएमआरडीएने प्रोजेक्टवर टोल आकरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा या मार्गावरील प्रवास महागणार आहे.

नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह बोगदा; ९ किमी लांबीचा कसा असेल मार्ग? टोलसाठी भरावे लागणार अधिक पैसे

दुसरीकडे MMRDA ने मुंबई आणि ठाण्यातही काही नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची योजना आखली आहे. अशा प्रोजेक्टसाठी एमएमआरडीएने परदेशी बँकेकडून कर्ज घेतलं आहे. त्याशिवाय बीकेसी येथील त्यांचा प्लॉट ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

atal setu orange gate marine drive tunnelnavi mumbai atal setuorange gate marine drive tunnelअटल सेतू ते मरिन ड्राईव्हअटल सेतू मरिन ड्राईव्ह ऑरेंज गेट टनलनवी मुंबई अटल सेतू ऑरेंज गेट मरिन ड्राईव्ह बोगदा
Comments (0)
Add Comment