Pushpa 2 Advance Booking: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ची चर्चा साता समुद्रापारही पाहायला मिळते आहे.
हायलाइट्स:
- ‘पुष्पा २’चा ट्रेलर येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- अमेरिकेत दणक्यात सुरूये Advance Booking
- आतापर्यंत किती झाली कमाई?
‘पुष्पा २’च्या परदेशातील तिकीट विक्रीसंदर्भात महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत ‘पुष्पा २’च्या प्रीमियर शोसाठी ८३० हून अधिक ठिकाणी बुकिंग झाले. याकरता ३१ हजारहून अधिक तिकिटांची विक्री झाली असून, त्यामधून ८७३०० यूएस डॉलर्स म्हणजेच ७.३६ कोटींची कमाई झाली आहे.
या सिनेमाच्या आगाऊ बुकिंगची सुरुवात मोठ्या धूमधडाक्यात झालेली, मात्र काही दिवसांनी यामध्ये घसरण पाहायला मिळाली. आता ‘पुष्पा २’ची १७ नोव्हेंबर रोजी विशेष चर्चा पाहायला मिळतेय, कारण यादिवशी संध्याकाळी सिनेमाचा ट्रेलर भेटीला येणार आहे. त्यामुळे या ट्रेलर लाँचचा बुकिंगसाठी किती फायदा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुलना करायची झाल्यास, प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ने प्रीमियर शोसाठी ३.९ मिलियन यूएस डॉलर्स ची कमाई केली होती. तर प्रीमियर शोमध्ये सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड अजूनही SS राजामौली यांच्या ‘बाहुबली २’च्या नावावर आहे. या सिनेमाने ४.३ मिलियन यूएस डॉलर्सची कमाई केलेली. ‘पुष्पा २’मध्ये सिनेमात अल्लू-रश्मिका यांच्यासह फहाद फासिल, जगपती बाबू आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.