गुहागरमध्ये वंचितच्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला, प्रचाराच्या धामधुमीत कोकणात खळबळ

Attack On Anna Jadhav Vanchit Bahujan Aghadi Guhagar : वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रसाद रानडे, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले असून गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला आहे. गुहागर तालुक्यात नरवण गावात हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

२०१९ च्या विधानसभेचे उमेदवार आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर रविवारी दुपारी गुहागर तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलबाहेर प्राणघातक हल्ला झाला.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन
उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहेत. अण्णा जाधव यांच्या हातावर चाकू हल्ला झाला, यात त्यांच्या हातावर खोल जखम झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे.

गुहागरमध्ये वंचितच्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला, प्रचाराच्या धामधुमीत कोकणात खळबळ

वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा मतदारसंघाचे २०२९ चे उमेदवार आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाल्याने कोकणात मोठी खळबळ उडाली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ हा काहीसा शांत आणि संस्कृती जपणारा म्हणून ओळखला जातो, मात्र याच मतदारसंघात अशी दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा हल्ला नेमका कोणत्या प्रकरणातून झाला? कोणी केला? याचा शोध गुहागर पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश गुहागर पोलिसांना दिले आहेत.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Anna Jadhav Guhagar Vanchit District Presidentattack on Anna Jadhav Vanchit District Presidentratnagiri Vanchit District President attackअण्णा जाधव प्राणघातक हल्लागुहागर अण्णा जाधव प्राणघातक हल्लागुहागर वंचित जिल्हाध्यक्ष प्राणघातक हल्लारत्नागिरी वंचित जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव हल्ला
Comments (0)
Add Comment